द्वारका भुयारी मार्गाच्या वापराकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:15 IST2021-02-24T04:15:37+5:302021-02-24T04:15:37+5:30

--- वडाळा नाका येथे गटारीचे काम रेंगाळले नाशिक : वडाळा नाका येथे भुयारी गटारीचे काम रेंगाळल्याने वाहतूक कोंडीची समस्या ...

Ignoring the use of Dwarka subway | द्वारका भुयारी मार्गाच्या वापराकडे दुर्लक्ष

द्वारका भुयारी मार्गाच्या वापराकडे दुर्लक्ष

---

वडाळा नाका येथे गटारीचे काम रेंगाळले

नाशिक : वडाळा नाका येथे भुयारी गटारीचे काम रेंगाळल्याने वाहतूक कोंडीची समस्या जटिल बनत चालली आहे. यामुळे वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. येथील गटारीचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे. जेणेकरून वाहतुकीचा खोळंबा दूर होण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

-----

चेंबरच्या ढाप्यांमध्ये वाहने आदळून अपघात

नाशिक : शहर व परिसरातील विविध रस्त्यांवर असलेल्या भूमिगत गटारींच्या चेंबरचे ढापे फुटलेले आहे. तर काही ठिकाणी ढापे खाली गेल्याने खड्डे तयार होऊन रस्त्यांना ढापे समांतर नसल्यामुळे वाहने आदळून अपघात होत आहे. विशेषत: दुचाकीस्वारांच्या दुचाकींचा तोल अशा ढाप्यांमुळे जाऊन ते रस्त्यावर कोसळत आहेत. चांडक सर्कल ते मुंबई नाका रस्ता, काठे गल्ली ते बनकर चौक रस्त्यासह ज्या रस्त्यांवर नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे, अशा सर्वच भागांमध्ये ही समस्या पाहावयास मिळत आहे.

Web Title: Ignoring the use of Dwarka subway