हिंदुत्ववादी सरकारकडूनच सिंहस्थाकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: April 12, 2015 00:45 IST2015-04-12T00:45:21+5:302015-04-12T00:45:55+5:30
अधोक्षजानंद : गोदावरीच्या प्रदूषणाबद्दल चिंता

हिंदुत्ववादी सरकारकडूनच सिंहस्थाकडे दुर्लक्ष
नाशिक : गंगा नदीच्या तीरावर होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी बिगर हिंदू सरकार असतानाही तो कुंभमेळा यशस्वी झाला होता. याउलट हरिद्वार येथे हिंदुत्ववादी सरकार असताना तेथील कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची उदाहरणे असून, त्यामुळे हिंदुत्ववादी सरकार असलेल्या ठिकाणीच सिंहस्थाकडे दुर्लक्ष होत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप शंकराचार्य अधोक्षजानंद यांनी केला.
पुण्याहून मुंबई येथे जात असताना नाशिकला कॉँग्रेस पदाधिकारी लक्ष्मण मंडाले यांच्या निवासस्थानी आले असता ते बोलत होते.