इगतपुरीला मुसळधार पावसाने झोडपले

By Admin | Updated: July 3, 2016 23:59 IST2016-07-03T22:44:11+5:302016-07-03T23:59:01+5:30

इगतपुरीला मुसळधार पावसाने झोडपले

Igatpuri was overwhelmed with heavy rains | इगतपुरीला मुसळधार पावसाने झोडपले

इगतपुरीला मुसळधार पावसाने झोडपले

इगतपुरी : इगतपुरी शहर आणि परिसराला चोवीस तास मुसळधार पावसाने झोडपले .
गेल्या तीन ते चार दिवसांपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाने गेल्या चोवीस तासात धो धो बरसात केली. आज दिवसभर इगतपुरी शहर व परिसराला चांगलेच झोडपले. पावसामुळे बाजारपेठेत दुकानदारांची धावपळ उडाली होती. यामुळे दिवसभरात बाजारात मंदी जाणवत होती. जनजीवन विस्कळीत झाले होते. आजपर्यंत १४१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली, तर एकूण ४१४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, शहरातील रविवारचा बाजार असल्याने विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला पाणी साचले होते
भिजमार्केट परिसरात भाजी विक्रेत्यांची धावपळ उडाली होती. तसेच भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना पावसापासून बचावासाठी विविध दुकानांचा आश्रय घ्यावा लागला. बुद्धविहाराजवळील जुन्या आग्रा मार्गावर गुडघ्याएवढे पाणी साचले होते. वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती .
शनिवारी शाळा लवकर सुटल्याने विद्यार्थ्यांची पावसामुळे धावपळ उडाली. गेल्या दोन ते तीन दिवस मधून मधून हलक्या सरींचा पाऊस पडत होता. मात्र आज पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गात आनंदमय वातावरण पसरले आहे.
इगतपुरी शहर ते महामार्गावर धुके
आज सकाळपासून इगतपुरी शहरासह कसारा घाटातील महामार्ग धुक्याने वेढला गेला होता. वाहनचालकांना भरदिवसा गाडीच्या लाईट चालू ठेवत हळूहळू मार्गक्र मण करावे लागत होते.
पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यात गत महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली होती. मागील महिन्यात झालेल्या रिमझिम व एक दोन दिवस दमदार पावसानंतर पावसाने दडी मारल्याने तालुक्याला चिंता लागून राहिली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जास्त आहे असे वेधशाळेकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Igatpuri was overwhelmed with heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.