कोरोना उपाययोजनांचा इगतपुरीत आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:43 IST2021-02-23T21:19:22+5:302021-02-24T00:43:48+5:30
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजनाचा आढावा घेतला जात आहे. गोंदे औद्योगिक वसाहतीमध्ये सर्वाधिक कंपन्या असल्याने उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी भेट देऊन उपाययोजनाची पाहणी केली व कंपनी व्यवस्थापकांना सूचना केल्या.

कोरोना उपाययोजनांसंदर्भात इगतपुरी तालुक्यातील गोंदे परिसरातील कंपनी व्यवस्थापकांशी चर्चा करताना उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण.
ठळक मुद्देकोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजनाचा आढावा घेतला जात आहे. गोंदे औद्योगिक वसाहतीमध्ये सर्वाधिक कंपन्या असल्याने उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी भेट देऊन उपाययोजनाची पाहणी केली व कंपनी व्यवस्थापकांना सूचना केल्या.
कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तालुक्यातील सर्व नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होऊन नियमांचे तंतोतंत पालन करत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी केले आहे.