इगतपुरीत राष्ट्रीय एकात्मता रॅली
By Admin | Updated: October 3, 2014 01:09 IST2014-10-03T01:06:02+5:302014-10-03T01:09:53+5:30
इगतपुरीत राष्ट्रीय एकात्मता रॅली

इगतपुरीत राष्ट्रीय एकात्मता रॅली
इगतपुरी : गांधीजयंतीनिमित्त शांतीचा संदेश देण्यासाठी निघणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता रॅली दिमाखात निघाली. यावेळी शाळकरी मुलांपासून आबालवृद्धांनी सहभाग घेतला . कै. सुधीर तांबोळी यांनी सन १९८३ साली गांधीजयंतीदिनी रॅलीला सुरुवात केली होती. सलग २५ वर्षापर्यंत दरवर्षी निघणारी या रलीची नोंद ग्रीनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदली गेली आहे.
शोभायात्रची सुरूवात तहसील चौकापासून झाली. यावेळी संजय जितकर, पोलीस उपनिरीक्षक रमेश परदेशी, अशोक नावंदर, आदर्श सोशल ग्रुपचे अध्यक्ष अजित पारख, सुधीर काटकर, संजय भाटिया, पांडुरंग तेलोरे, सतार मणियार, सुरेश संधान, गरचा बाबूजी, समद खिलफा आदिंसह नागरिक उपस्थित होते. महात्मा गांधी की जय, शांती के दूत गांधीजी, गांधी तेरा नाम अमर रहेगा आदि घोषणा देत रॅली जुना मुंबई-आग्रा रोड, बाजारपेठ गांधी चौक मार्गे महात्मा गांधी शाळेत सांगता झाली. यावेळी प्राचार्य भा. फ. एलीन्जे, प्रसाद चौधरी, विजय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)