शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या बदलीमुळे नाशिकचा विकास होणार असेल तर जरूर बदली करा- तुकाराम मुंढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 18:51 IST

माझ्या बदलीमुळे नाशिकचा विकास होणार असेल तर निश्चितच बदली करा

नाशिक- माझ्या बदलीमुळे नाशिकचा विकास होणार असेल तर निश्चितच बदली करा, अशी खंत नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती त्यांनी हे बोलून दाखवलं आहे. नगरसेवक निधी हा 75 लाखांच्या घरात असतो. कायद्यानुसार नगरसेवक निधी बजेटच्या 2 टक्के असतो, तो कायम ठेवलेला आहे. गेल्या पाच वर्षांत नगरसेवकांनी 75 लाखांमधला एक रुपयाही खर्च केलेला नाही. कायद्याच्या चौकटीत राहूनच मी कारवाई केलेली आहे. नगरसेवकांच्या लांगुलचालनाला मी थारा देत नाही, म्हणून नगरसेवकांना त्यांचा अपमान करतो असे वाटत असेल, तर ते अत्यंत चुकीचं आहे.जी गोष्ट अयोग्य आहे, कायद्याच्या चौकटीत बसत नाही, अशा गोष्टी मी कराव्यात ही नगरसेवकांची माझ्याकडून अपेक्षा आहे. त्यामुळे जर त्यांना मी चुकीच्या पद्धतीनं काम करत असेल असं वाटत असेल, तर ते नागरिकांनी ठरवायचं आहे. ज्यांनी अविश्वास ठराव आणला त्यांनी ठरवायचं आहे. माझं काम हे नाशिकच्या विकासासाठी सुरू आहे. तरीही माझी बदली करायची इच्छा मुख्यमंत्र्यांनी अवश्य करावी, परंतु नगरसेवकांनी केलेले आरोप हे तकलादू आहेत. त्यामुळे मी त्यांना फार महत्त्व देत नाही, असंही तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलं आहे.

तुकाराम मुंढेंना नागरिकांचा पाठिंबामनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजपा नगरसेवक यांनी केलेल्या अविश्वास ठरावाविरुद्ध मुंढे यांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी राजू देसले, हंसराज वडघुले, निशिकांत पगारे, समाधान भारती, योगेश कापसे, ज्योती नटराजन, राकेश पवार, स्वप्निल घिया,अभिजीत गोसावी, दत्तू बोडके आदींसह नागरिक उपस्थित होते. 

'वाचवा कमिशनर' अभियान राबविण्यासाठी सर्वसामान्य नाशिककर एकवटलेनाशिक सत्ताधारी भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपाने कायद्याच्या चौकटीत राहून स्वच्छ प्रशासन आणि कारभार करणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केले आहेत, या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येच सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नाशिककर मुंडेंच्या समर्थनात एकवटले आहे. 'वाचवा कमिशनर' हे अभियान हाती घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे