शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी नाकारल्यास विचारणार जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 01:25 IST

गेल्यावेळी राष्टवादी कॉँग्रेसच्या ज्या उमेदवाराला भाजपाने अडीच लाख मतांनी पराभूत केले त्या डॉ. भारती पवार यांनी नुकताच मुंबई येथे भाजपात प्रवेश केला असून, त्यामुळे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक : गेल्यावेळी राष्टवादी कॉँग्रेसच्या ज्या उमेदवाराला भाजपाने अडीच लाख मतांनी पराभूत केले त्या डॉ. भारती पवार यांनी नुकताच मुंबई येथे भाजपात प्रवेश केला असून, त्यामुळे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांना उमेदवारी दिली तर तो माझ्यावर अन्यायच ठरेल अशी भावना व्यक्त करणाऱ्या चव्हाण यांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठीे पक्षाचा मेळावाही आयोजिला आहे.खासदारकीची हॅट््ट्रिक करणाऱ्या चव्हाण यांना सहजासहजी उमेदवारी मिळणार नाही अशी भाजपात चर्चा होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांनी भारती पवार यांचा दोन लाख ४७ हजार मतांनी पराभव केला होता. आताही त्या राष्टÑवादीच्या संभाव्य उमेदवार मानल्या जात होत्या. परंतु शिवसेनेतून राष्टÑवादीत दाखल झालेल्या धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर भारती पवार यांची आशा संपुष्टात आली. त्यानंतर त्या भाजपात दाखल झाल्या. परिणामी खासदार हरिश्चंद्र चव्हाण उमेदवारीसाठी वेटिंगवर आहेत. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २२) दुपारी चव्हाण यांच्या नाशिकमधील निवासस्थानी समर्थकांची तातडीची बैठक घेण्यात आली. यात चव्हाण यांना डावलून भारती पवार यांना प्रवेश देण्यात आल्याने संघटनेवरच तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पक्षाशी संबंधित नसलेल्यांना अशाप्रकारे पक्षात स्थान देणे गैर आहे, असे सांगतानाच यावेळी मतदारसंघातील समर्थकांची बैठक घेऊन भूमिका निश्चित करण्याचे ठरविण्यात आले.दरम्यान, भारती पवार यांच्या प्रवेशाचे स्वागतच, मात्र मला डावलून त्यांना तिकीट मिळाले तर तो माझ्यावर अन्याय ठरेल, असे खासदार चव्हाण यांचे म्हणणे आहे. भारती पवार यांच्या प्रवेशाबाबत मला कुठलीही विचारणा झाली नव्हती असे सांगून आपल्या उमेदवारीबाबत अद्याप दिल्लीत कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही, परंतु पक्ष विचार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गेली पंधरा वर्षे संसदेतील माझे कामकाज पक्षाचे वरिष्ठ नेते बघत आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्या कामगिरीची तुलना करून निर्णय घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.मग तो सर्व्हे कोणता?हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी अडचणीत आणण्याला एक सर्व्हे कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. मग, राष्टवादीला ज्या उमेदवाराच्या विजयाची खात्री नव्हती, तो उमेदवार भाजपाच्या सर्व्हेत यशस्वी कसा ठरला, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकHarishchandra Chavanहरिश्चंद्र चव्हाणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस