सुरेशदादा जैन यांची येवल्यास सदिच्छा भेट

By Admin | Updated: November 9, 2016 23:55 IST2016-11-09T23:46:49+5:302016-11-09T23:55:27+5:30

सुरेशदादा जैन यांची येवल्यास सदिच्छा भेट

If you prefer Sureshdada Jain then visit the goodwill | सुरेशदादा जैन यांची येवल्यास सदिच्छा भेट

सुरेशदादा जैन यांची येवल्यास सदिच्छा भेट

येवला : राहता येथून जळगावकडे जाताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी येवला शहराला सदिच्छा भेट दिली. येथील विंचूर चौफुलीवरील येवला जैन ओसवाल समाजाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष विजयकुमार श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते जैन यांचा सत्कार करण्यात आला.
सुरेशदादा जैन यांच्या समवेत मुलगी मीनाक्षी जैन होत्या. यावेळी जैन यांनी समाजाची आस्थेने चौकशी करून जैन स्थानकात चालत असलेल्या धार्मिक विधींबाबत माहिती घेतली.
याप्रसंगी जैन समाजाचे उपाध्यक्ष सतीश समदडिया, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष राजेश भंडारी, रवींद्र बाफणा, उमेदमल श्रीश्रीमाळ, सुभाष समदडिया, सुरज पटणी, सुरेश बंब, सोहनलाल दुगड, दिनेश बाफणा, महावीर मंडलेचा, हर्षद पारख, सुभाष पारख, सिद्धार्थ पारख, आशिष शिंगी, वीरचंद शिंगी, दर्शन भंडारी, प्रवीण श्रीश्रीमाळ, पारस बाफणा, दिलीप मुथा, मदन चंडालिया आदिंसह जैन बांधव, महिला व युवक उपस्थित होते.

Web Title: If you prefer Sureshdada Jain then visit the goodwill