शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

...तेव्हा चुकला काळजाचा ठोक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:34 IST

क्यूआरटी, अग्निशामक दल मुलांना सुरक्षित उतरविण्यासाठी जिवावर उदार होऊन प्रयत्न करत होते... डोंगरदºयांमध्ये बचावकार्यासाठी लागणारे पुरेसे साहित्य त्यांच्याकडे नव्हते... तरीदेखील बचावकार्याची मोहीम त्यांनी यशस्वी करून दाखविली; मात्र यावेळी अनर्थ होता होता टळला हे तितकेच खरे... शीघ्र कृती दलाच्या जवानांनी ज्या दगडाला दोरखंडाचा ‘यू’ केला होता तो दगड गदागदा हलत होता. शेवटचा जवान शिखरमाथ्यावरून दोरखंडाच्या साहाय्याने खाली उतरताना अखेर काही मोठे दगड निखळले.. अन् उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला...

नाशिक : क्यूआरटी, अग्निशामक दल मुलांना सुरक्षित उतरविण्यासाठी जिवावर उदार होऊन प्रयत्न करत होते... डोंगरदºयांमध्ये बचावकार्यासाठी लागणारे पुरेसे साहित्य त्यांच्याकडे नव्हते... तरीदेखील बचावकार्याची मोहीम त्यांनी यशस्वी करून दाखविली; मात्र यावेळी अनर्थ होता होता टळला हे तितकेच खरे... शीघ्र कृती दलाच्या जवानांनी ज्या दगडाला दोरखंडाचा ‘यू’ केला होता तो दगड गदागदा हलत होता. शेवटचा जवान शिखरमाथ्यावरून दोरखंडाच्या साहाय्याने खाली उतरताना अखेर काही मोठे दगड निखळले.. अन् उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला... सुदैवाने दगड वरच्या टप्प्यावर झाडाझुडुपांत अडकल्याने दुर्घटना टळली.  वैनतेय संस्थेच्या गिर्यारोहकांना पोलीस नियंत्रण कक्ष व जिल्हा आपत्ती कक्षातून सुमारे सव्वा बारा वाजेच्या सुमारास दूरध्वनीवरून सदर घटनेची माहिती देत मदतकार्यासाठी बोलविले गेले. संस्थेच्या गिर्यारोहकांनी सर्व आवश्यक त्या साधनांची जमवाजमव करीत पोलीस वाहनाच्या मदतीने एक वाजेच्या सुमारास चामरलेणी गाठली. यावेळी आठ सदस्य अवघ्या वीस मिनिटांत शिखरमाथ्यापर्यंत पोहचले. त्यावेळी तीन मुलांना ‘रेस्क्यू’ करण्यात पोलिसांना यश आले होते. ‘वैनतेय’च्या सदस्यांनी शिखरमाथा गाठून चौथ्या मुलाला दुसºया बाजूने सुखरूप खाली उतरविले. अपुºया साहित्यामुळे कोंडी डोंगरदºयात बचावकार्यासाठी  लागणाºया साधनसामग्रीचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे अभाव दिसून आला. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे चार कर्मचारी बचावकार्यासाठी सुमारे एक वाजता पोहचले; मात्र त्यांच्याकडे पुरेसे साहित्य नसल्याने कोंडी झाली. पोलीस दलाकडे असलेल्या दोरखंडाच्या माध्यमातून मोहीम राबविली जात  होती. दरम्यान, डोंगरदºयात बचावकार्याचा अनुभव पाठीशी असणाºया वैनतेय संस्थेला दुपारी सव्वा बारा वाजता जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष व आपत्ती नियंत्रण विभागातून संपर्क साधण्यात आला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष गाफील  पोलीस नियंत्रण कक्षाला सकाळी साडेदहा वाजता घटनेची माहिती समजली. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी मदत चामरलेणीवर पोहचविली आणि बचावकार्य हाती घेतले; मात्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन याबाबत गाफील राहिल्याचे दिसून आले. आपत्ती व्यवस्थापन विभागाला नियंत्रण कक्षाकडून ‘अलर्ट’ दिल्यानंतर त्यांना जाग आली. त्यानंतर चार कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मात्र त्यांच्याकडे डोंगरदºयामध्ये बचावकार्यासाठी लागणारे पुरेसे साहित्य नसल्याने खोळंबा झाला. त्यानंतर वैनतेय संस्थेशी संपर्क साधण्यात आला आणि मदतीसाठी त्यांना पाचारण करण्यात आले. या सर्व खटाटोपात मुलांना खाली उतरविण्यास विलंब झाला. केवळ पावसाळ्यापुरते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असल्याचे यावेळी उघड झाले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस