आघाडी झाल्यास मालेगावचा महापौर काँग्रेसचाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST2021-09-10T04:20:57+5:302021-09-10T04:20:57+5:30
येथील उर्दू मीडिया सेंटरमध्ये गुरुवारी माजी आमदार शेख यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. ...

आघाडी झाल्यास मालेगावचा महापौर काँग्रेसचाच
येथील उर्दू मीडिया सेंटरमध्ये गुरुवारी माजी आमदार शेख यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, जनता दलाचे मुस्तकीम डिग्निटी व एमआयएमचे डॉ. खालीद परवेझ यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे चार महापौर झाले. चारही महापौरांच्या कार्यकाळात शहर विकासाची कामे मार्गी लागली आहेत. जुना आग्रारोड, कुसुंबा रोडची दुरुस्ती युद्ध पातळीवर सुरू असताना विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. काँग्रेसची कामे जमिनीवर आहेत. आरोप-प्रत्यारोप करून निवडणुका जिंकता येत नाही. आगामी काळात स्थानिक पातळीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाल्यास काँग्रेसचाच महापौर विराजमान होईल. विकासासोबत नागरिकांनी राहावे, असे आवाहन माजी आमदार शेख यांनी केले. पत्रकार परिषदेला जाकीर शेख, जैनू पठाण, अब्दुल करीम, साबीर गोहर आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो फाईल नेम : ०९ एमएसईपी ०७ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी उर्दू मीडिया सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार रशीद शेख. समवेत जाकीर शेख, जैनू पठाण, अब्दुल करीम, साबीर गोहर आदी.
090921\09nsk_28_09092021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.