शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

करवाढ रद्द न झाल्यास सभागृहात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:14 AM

नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेषााधिकाराचा वापर करून केलेल्या दरवाढीच्या विरोधात वज्रमूठ करण्यात विरोधकांना प्राथमिक स्तरावर यश मिळाले असून, करवाढ रद्द करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.१९) महासभेत सर्व प्रथम याच विषयावर चर्चा करावी आणि जाचक करवाढ रद्द करावी अन्यथा सभा गुंडाळली तरी सभागृहातच ठिय्या आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे. त्यामुळे गुरुवारी होणारी महासभा गाजणार असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देबैठकीत निर्णय : महापौरांना पूर्वकल्पना देताच दिला इशारा

नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेषााधिकाराचा वापर करून केलेल्या दरवाढीच्या विरोधात वज्रमूठ करण्यात विरोधकांना प्राथमिक स्तरावर यश मिळाले असून, करवाढ रद्द करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.१९) महासभेत सर्व प्रथम याच विषयावर चर्चा करावी आणि जाचक करवाढ रद्द करावी अन्यथा सभा गुंडाळली तरी सभागृहातच ठिय्या आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे. त्यामुळे गुरुवारी होणारी महासभा गाजणार असल्याचे दिसत आहे.मंगळवारी (दि.१७) यासंदर्भात विरोधी पक्षनेता दालनात दुपारी बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, भाजपाचे गटनेते संभाजी मोरुस्कर, त्याचप्रमाणे विलास शिंदे, शाहू खैरे, गजानन शेलार, गुरुमित बग्गा, सलीम शेख, दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती थेट रामायण गाठून महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सभागृह नेते दिनकर पाटील यांना देण्यात आली. या घटनेनंतर भाजपाचे सबुरीचे धोरण घेतले असले तरी मुळातच विरोधकांच्या बैठकीत सभागृह नेते आणि गटनेतेदेखील उपस्थित असल्याने त्यासंदर्भात तूर्तास एकमत झाल्याचे दिसत आहे.महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्च महिन्यात जमिनींचे सरकारी भाडेमूल्य जाहीर केले. त्याचबरोबर खुल्या भूखंडावरदेखील असलेल्या कराच्या दरात वाढ केली. यासंदर्भात बोलविण्यात आलेल्या विशेष महासभेत विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निर्माण घेता येत नसल्याने आता १९ तारखेला सभा होणार असून, त्यासंदर्भात रणनिती आखण्यासाठी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी ही बैठक बोलविली होती. त्यात ठरल्यानुसार नाशिककरांवर होणारी करवाढ भाजपासह कोणत्याच पक्षाला समर्थनीय नाही. त्यामुळे सत्तारूढ आणि विरोधक, असा विचार न करता नाशिककर म्हणून भूमिका घ्यावी, असे ठरविण्यात आले. विरोधक विरोधाला विरोध करणार नाहीत. सभागृहात सर्व चर्चेअंती करवाढीबाबत निर्णय व्हावा, अशी अपेक्षा आहे. महासभेच्या प्रारंभी कुठल्याही परिस्थितीत करवाढीचाच विषय घेण्यात यावा, त्यावर चर्चा झाल्यानंतरच मग प्रशासनाने बंद केलेल्या १३६ आंगणवाड्यांचा प्रस्ताव चर्चेला घ्यावा, असे ठरविण्यात आले. महापौरांनी या क्रमवारीत बदल केला अथवा महासभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला तर विरोधक सभागृहातच ठिय्या मांडतील, असा इशारा देण्यात आला.भाजपाचे तळ्यात मळ्यात?४विरोधकांच्या बैठकीला सत्तारूढ पक्षाचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनी हजेरी लावलीच, परंतु त्याचबरोबर गटनेते संभाजी मोरुस्कर पूर्णवेळ हजर होते. मात्र, विरोधीपक्षांनी एकमताने ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी शहराध्यक्ष आणि आमदारांशी चर्चा करावी लागेल वगैरे सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपा महासभेत नक्की काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.४महापालिकेच्या याच महासभेत काही अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचे तर काही सेवानिवृत्त अधिकाºयांवर कारवाई करण्याचे प्रस्ताव आहेत. त्यातील अनेक अधिकाºयांनी लॉबिंग सुरू केले असून, गटनेत्यांची आणि सत्तारूढ नेत्यांच्या भेटीगाठींना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे सभागृहात करवाढीच्या निमित्त करून अधिकाºयांनी वाचवले जाते की, कारवाईस मान्यता दिली जाते हा सध्या महापालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.पालकमंत्र्याचा आज निर्णय४करवाढीबाबत महासभेत विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता गृहीत धरून त्याची हवा काढण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन बुधवारी (दि. १७) निर्णय घेण्याची शक्यता आहे. तथापि, त्यांनी काहीही निर्णय दिला तरी महासभेत निर्णय घेऊनच त्याला वैधानिक स्वरूप देता येऊ शकेल.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका