१६ तासांत ऑक्सिजन पुरवठा न झाल्यास रुग्ण स्थलांतरास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:18 IST2021-04-30T04:18:16+5:302021-04-30T04:18:16+5:30
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा कमी हाेत आहे. त्यामुळे ऑक्सिजन संपणार असल्याचे स्पष्ट होऊ लागताच, ...

१६ तासांत ऑक्सिजन पुरवठा न झाल्यास रुग्ण स्थलांतरास परवानगी
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा कमी हाेत आहे. त्यामुळे ऑक्सिजन संपणार असल्याचे स्पष्ट होऊ लागताच, रुग्णांच्या नातेवाईकांना संबंधितांना परत नेण्यास सांगितले जाते. तसेच महापालिकेकडेही रुग्ण स्थलांतरासाठी परवानगी मागितली जाते. ही आणीबाणी टाळण्यासाठी आता महापालिकेने ऑक्सिजन हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली असून, तिचा दूरध्वनी क्रमांक ०२५३- २२२०८०० व नाशिक जिल्हा मेडिकल ऑक्सिजन नियंत्रण कक्षाचा ९४०५८६९९४० असा आहे. मात्र नियोजनाचा भाग म्हणून खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजनची मागणी त्यांच्या संबंधित ऑक्सिजन पुरवठादाराकडे किमान २४ तास किंवा त्यांच्या पुरवठादाराशी असलेल्या करारनाम्याप्रमाणे नोंदवावी, तद्नंतर सोळा तासांत पुरवठा न झाल्यास महानगरपालिकेच्या ऑक्सिजन हेल्पलाइनला रुग्णालयांनी संपर्क साधावा. त्यानुसार हेल्पलाइनतर्फे ऑक्सिजन पुरवठाधारकास ऑक्सिजन पुरवठा करण्यास सांगितले जाईल, तसेच याबाबत जिल्हा ऑक्सिजन हेल्पलाइन कक्षास माहिती दिली जाईल. पुरवठादाराकडे ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसल्यास अप्पर जिल्हाधिकारी यांचे संनियंत्रणातील मेडिकल ऑक्सिजन नियंत्रण कक्षास कळवण्यात येईल. त्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर करण्यास मदत होणार आहे
इन्फेा..
ऑक्सिजन ऑडिट सक्तीचे
मनपाच्या वतीने सर्व खासगी रुग्णालय व्यवस्थापकांनी त्यांचे रुग्णालयाचे ऑक्सिजन ऑडिट करून घेण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. रुग्णालयामधील ऑक्सिजनची गळती तसेच ऑक्सिजन यंत्रणांमधील विविध सामग्री यांची देखभाल-दुरुस्ती याबाबत प्रमाणपत्र अहवाल सर्व रुग्णालय व्यवस्थापकांनी मनपास सादर करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहे.