न्यायडोंगरी : गेल्या काही दिवसांपासून येथील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीने तळ गाठला असून, गावाला पाणी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गावातील पाणीप्रश्न गंभीर असताना गटविकास अधिकारी म्हणतात पिण्याचे पाणी उपलब्ध असतानाही गावास पाणीपुरवठा केला जात नाही. ग्रामपंचायतीचे नियोजन नसल्यानेच गावाला पाणी मिळत नसल्याचा खुलासा लेखी पत्राद्वारे करण्यात आला आहे. यामुुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून, उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पाऊस पडावा म्हणून प्रत्येक ग्रामस्थ आपापल्या परीने देवाला साकडे घालत आहे.
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून?ग्रामस्थ संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 19:07 IST