शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

"धाकटे बंधू गोपीनाथ मुंडे हयात असते, तर जेलमध्ये गेलो नसतो!"

By अमोल यादव | Updated: March 18, 2023 18:52 IST

आयुष्यभर जनतेवर निरपेक्ष प्रेम करणारे मुंडे साहेब हयात असते, तर मी अडीच वर्ष जेलमध्ये गेलोच नसतो. ते पहाडाप्रमाणे माझा पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असते, अशा भावना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.

नाशिक : लोकनेते गोपीनाथ मुंडे हे माझे धाकटे बंधू होते. त्यांचा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचा राजकीय प्रवास अभिमानस्पद होता. ओबीसी चळवळीत ते मला मोठा बंधू मानत. आयुष्यभर जनतेवर निरपेक्ष प्रेम करणारे मुंडे साहेब हयात असते, तर मी अडीच वर्ष जेलमध्ये गेलोच नसतो. ते पहाडाप्रमाणे माझा पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असते, अशा भावना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या. नांदूर शिंगोटे (ता. सिन्नर) येथे साकारण्यात आलेल्या गोपीनाथ गडाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. १८) पार पडला. याप्रसंगी भुजबळ बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आदींसह मान्यवर उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, स्व. मुंडे यांनी राज्यातील ओबीसींसह पीडित सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर लढा दिला. त्याच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचे काम सुरू ठेऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी बोलतांना भुजबळ, स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपले आयुष्य खर्च केले. माजी खासदार समीर भुजबळ यांचे वडील व माझे मोठे भाऊ मगन भुजबळ यांचे दुःखद निधन झाले तेव्हा मला अतिव दुःख झाले होते. धाकटे बंंधू गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने देखील तितकेच दुख: झाले, अशा भावना भुजबळ यांनी व्यक्त केल्या.भारतीय जनता पक्ष घराघरात पोहचवण्यासाठी मुंडे व प्रमोद महाजन यांनी संघर्ष केला. राज्यात ‘माधव’चा प्रयोग यशस्वी करण्यातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. ओबीसी चळवळीसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. खासदार समीर भुजबळ यांनी संसदेत ओबीसी जनगणनेचा प्रस्ताव पुढे ठेवला, तेव्हा आपल्या पक्षाच्या भूमिकेचा विचार लक्षात न करता ओबीसी बांधवांची गणना का होत नाही? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला होता. आज ते असते तर जनजणनेचा प्रश्न नक्कीच मार्गी लागला असता, असा विश्वास देखील भुजबळ यांनी व्यक्त केला.

ओबीसींसह, गरजू, वंचितांना न्याय देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पुर्ण करावे. हीच मुंडे यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असे भुजबळ यांनी सांगीतले. तसेच पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत असून ही अभिमानास्पद बाब असे सांगत अखेरच्या क्षणापर्यंत मुंडे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करण्याचे आश्वासन भुजबळ यांनी दिले. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळGopinath Mundeगोपीनाथ मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा