..अन् मुलांना केले शाळेत दाखल
By Admin | Updated: August 18, 2016 23:34 IST2016-08-18T23:34:19+5:302016-08-18T23:34:19+5:30
..अन् मुलांना केले शाळेत दाखल

..अन् मुलांना केले शाळेत दाखल
निफाड : रोजीरोटीसाठी त्यांना शिक्षण अर्धवट सोडून पालकांबरोबर गावोगाव हिंडावे लागते. असेच निफाड येथे आलेल्या एका कुटुंबातील मुलांकडे निफाडचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी हेरले अन् त्यांना नजीकच्या शाळेत दाखल केले.
पोलीस निरीक्षक रणजित डेरे गस्त घालत असताना उपजिल्हा रुग्णालयासमोर चार मुले झोपडीजवळ दिसले. त्यांची विचारपूस केली असता ते शाळेत जात नसल्याचे कळले. त्यानंतर डेरे यांनी त्यांना शाळेत दाखल करण्यासाठी मदत केली. या चार मुलांपैकी दोघे गावाकडे शाळेत जात होते तर दोघे अजून शाळेत जात नव्हते. डेरे यांनी मुख्याध्यापक प्रमोद बाविस्कर यांची भेट घेतली. यात मुकेश राजू मोहिते यास चौथीत, रुपाली शिवाजी जाधवला तिसरीत प्रवेश देण्यात आला, तर पल्लवी जाधव व ऋत्विक मोहिते या दोघांपैकी एकाला पहिलीत प्रवेश देण्यात आला. यातील दोन मुले जी त्याच्या गावाकडे शाळेत जात होती त्यांचा दाखला मागवण्यात येईल, असे बाविस्कर यांनी सांगितले. (वार्ताहर)