शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
4
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
5
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
6
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
7
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
8
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
9
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
10
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
12
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
13
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
14
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
15
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
16
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
17
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
18
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
19
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
20
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
Daily Top 2Weekly Top 5

याज्ञवल्क्यांची मूर्ती नवनिर्मितीची प्रेरणा देणारी: सच्चीदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:05 IST

याज्ञवल्क्यांची मूर्ती मनाला प्रसन्नता देणारी असून, त्यातून सर्वांना नवनिर्मितीची प्रेरणा मिळेल. केवळ मौखिक परंपरेद्वारा वेदांच्या शिक्षणाची परांपरा आजवर वैदिकांनी जपून ठेवली आहे, असे प्रतिपादन गुरुवर्य सच्चीदानंद शेवडे महाराज यांनी केले.

ठळक मुद्देऋषींच्या मूर्तीचे अनावरण

पंचवटी : याज्ञवल्क्यांची मूर्ती मनाला प्रसन्नता देणारी असून, त्यातून सर्वांना नवनिर्मितीची प्रेरणा मिळेल. केवळ मौखिक परंपरेद्वारा वेदांच्या शिक्षणाची परांपरा आजवर वैदिकांनी जपून ठेवली आहे, असे प्रतिपादन गुरुवर्य सच्चीदानंद शेवडे महाराज यांनी केले.शुक्ल यजुर्वेदीय माध्यादिन संस्थेच्या यजुर्वेद मंदिरात शुक्रवारी याज्ञवल्क्य ऋषींच्या संगमरवरी मूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सतीश कुलकर्णी, कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती, महंत भक्तिचरणदास, अविनाश भिडे, पुरोहित संघ अध्यक्ष सतीश शुक्ल आदी उपस्थित होते.शेवडे पुढे म्हणाले, वैदिक काळात ज्ञानाच्या चरमसीमेचा वैभवशाली काळ भारतवर्षांनी बघितला इंग्रजांनी या वेदाचा विकृत अर्थ लावण्याचा प्रयत्न केला होता. नवीन घडविण्याची प्रेरणा आपल्याला याज्ञवल्क्यांच्या चरित्रातून मिळते असे त्यांनी शेवटी सांगितले. भानुदास शौचे यांनी प्रास्ताविक तर अनिल देशपांडे यांनी स्वागत केले. वैभव दीक्षित यांनी आभार मानले.यावेळी विजय जोशी, बाबूराव धारणे, श्रीकांत गायधनी, लक्ष्मण सावजी, पवन भगूरकर, बापू सोनवणे, चंद्रकांत महाजन, प्रमोद मुळे, राजन कुलकणी, अमोल जोशी, शरद कुलकर्णी, सुभाष भणगे, वंदना देशपांडे, ज्ञानेश देशपांडे उपस्थित होते.दुर्मीळ पद्धतीची मूर्तीकै. श्रीकृष्ण शास्त्री गोडसे, लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या फोटोवरून याज्ञवल्क्य ऋषींची मूर्ती बनविण्यात आली आहे. सदर मूर्ती दुर्मीळ आणि तीन फुटांची बैठी व ३० किलो वजनाची संगमरवरी आहे. शुक्ला यजुर्वेदीय ब्राह्मण संस्थेचे स्थापनेपासूनचे उद्दिष्ट यामुळे पूर्ण झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम