प्रबुद्धनगरमध्ये प्रतिमापूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:09 IST2020-12-07T04:09:53+5:302020-12-07T04:09:53+5:30
सातपूर : येथील प्रबुद्धनगरात माजी नगरसेविका ज्योती शिंदे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला . सामाजिक कार्यकर्ते बजरंग ...

प्रबुद्धनगरमध्ये प्रतिमापूजन
सातपूर : येथील प्रबुद्धनगरात माजी नगरसेविका ज्योती शिंदे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला . सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बुद्धवंदना त्रिशरण पंचशीलाने घेण्यात आले. प्रथमेश पालवे व दीपक दोंदे यांनी प्रबोधनपर गीत सादर केले. सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले. देवीदास अहिरे यांनी बुद्धवंदना घेतली. यावेळी रमेश जाधव, आप्पा आव्हाड, गणेश झनकर, ज्ञानेश्वर बटावे, देवराम पगारे, रमेश मोरे, रंगा पवार, संतोष पगारे, भाऊसाहेब पवार, रब्बानी शेख, कस्तुरबा वानखेडे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
फोटो :-
----- प्रबुद्धनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना माजी नगरसेविका ज्योती शिंदे. समवेत बजरंग शिंदे, देवीदास अहिरे, रमेश जाधव, आप्पा आव्हाड, गणेश झनकर, ज्ञानेश्वर बटावे, देवराम पगारे, रमेश मोरे, संतोष पगारे, भाऊसाहेब पवार, विक्रम शिंदे आदींसह समाजबांधव. (फोटो ०६ सातपूर ३)