देव्हाऱ्यातील सोन्याची मूर्तीची चोरी

By Admin | Updated: May 20, 2017 17:17 IST2017-05-20T17:17:26+5:302017-05-20T17:17:26+5:30

नेहेमी घरी येणाऱ्या ओळखीतील व्यक्तीनेच देव्हाऱ्यातील मोहाटा देवीची तीन तोळे वजनाची सोन्याची मूर्ती चोरून नेल्याची घटना सातपूरच्या महादेववाडीत घडली आहे़

The idol of gold idol of the Goddess is stolen | देव्हाऱ्यातील सोन्याची मूर्तीची चोरी

देव्हाऱ्यातील सोन्याची मूर्तीची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नेहेमी घरी येणाऱ्या ओळखीतील व्यक्तीनेच देव्हाऱ्यातील मोहाटा देवीची तीन तोळे वजनाची सोन्याची मूर्ती चोरून नेल्याची घटना सातपूरच्या महादेववाडीत घडली आहे़
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पद्मा वसंत डोंगरे हे महालक्ष्मी चौकात राहतात़ संशयित प्रकाश कचरू मोरे (रा़ मोरे मळा, नाशिकरोड) याचे नेहेमी त्यांच्या घरी येणे जाणे होते़ गुरुवारी (दि़१८) सकाळी ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास प्रकाश मोरे याने देव्हाऱ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मोहाटा देवीची सोन्याची मूर्ती चोरून नेल्याचे डोंगरे यांनी फिर्यादित म्हटले आहे़
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: The idol of gold idol of the Goddess is stolen