युवा शेतकऱ्याला आदर्श डाळिंब उत्पादक पुरस्कार

By Admin | Updated: May 6, 2017 23:11 IST2017-05-06T23:11:12+5:302017-05-06T23:11:24+5:30

सटाणा : पिंगळवाडे येथील शेतकरी नामदेव भामरे यांना आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्कार पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

Ideal Pomegranate Product Award for Young Farmer | युवा शेतकऱ्याला आदर्श डाळिंब उत्पादक पुरस्कार

युवा शेतकऱ्याला आदर्श डाळिंब उत्पादक पुरस्कार

 लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : बागलाण तालुक्यातील पिंगळवाडे येथील युवा शेतकरी नामदेव भामरे यांना आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्कार राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र व सोसायटी फॉर अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ रिसर्च आॅन पोमग्रेनेटच्या (सार्प) वतीने आयोजित राष्ट्रीय डाळिंब परिसंवादात गौरविण्यात आले.
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र व सोसायटी फॉर अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ रिसर्च आॅन पोमग्रेनेटच्या (सार्प)च्या वतीने दोन दिवसीय परिसंवाद सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती. डाळिंब संशोधन केंद्राच्या वतीने नव्याने विकसित केलेल्या दोन वाणांचे प्रसारण आणि शेतकरी प्रशिक्षण व निवास केंद्राचे उद्घाटन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या डाळिंब परिसंवादात भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. टी. महापात्र, भारतीय फलोत्पादन संस्थेचे अध्यक्ष डॉ. के. एल. चढ्ढा, प्रभाकर चांदणे, डॉ. के. पी. विश्वनाथा, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. के. पाल आदी मान्यवर या परिसंवादास उपस्थित होते.

Web Title: Ideal Pomegranate Product Award for Young Farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.