आदर्श अंगणवाडी सेविका-मदतनीस पुरस्काराचा संपेना घोळ
By Admin | Updated: March 25, 2015 01:07 IST2015-03-25T01:07:13+5:302015-03-25T01:07:42+5:30
बुधवारी पुरस्कार वितरण, सायंकाळी उशिरा केली घोषणा

आदर्श अंगणवाडी सेविका-मदतनीस पुरस्काराचा संपेना घोळ
नाशिक : आदर्श ग्रामसेवक व उत्कृष्ट अभियंता पुरस्कारापाठोपाठ आता आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कारांचा घोळ पुरस्कार वितरणाच्या पूर्वसंध्येपर्यंत सुरूच असल्याचे चित्र होते. सायंकाळी उशिरा ७८ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. बुधवारी (दि.२५) सकाळी ११ वाजता या पुरस्कारांचे वितरण तिडके कॉलनी येथील ग्रामसेवक भवन येथे अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती केदा अहेर, किरण थोरे, उषा बच्छाव, शोभा डोखळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड, महिला व बालकल्याण समितीचे सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. आदर्श अंगणवाडी सेविका यांना प्रत्येकी तीन हजार, तर आदर्श अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी दोन हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून, आदर्श पर्यवेक्षिका यांना केवळ सन्मानचिन्ह देण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे यांनी सांगितले. आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका प्रत्येकी २६ असे एकूण ७८ पुरस्कार देण्यात येणार आहेत.