विद्यार्थी वाहतूकदारांना मदतीची मागणी
नाशिक : कोरोनामुळे शाळा गत वर्षभर बंद राहिल्याने विद्यार्थी वाहतूकही वर्षभर बंद होती, तसेच नवीन वर्षातही ती पूर्ववत लवकर सुरू होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षा व स्कूल बसचालक गत वर्षभरापासून आर्थिक संकटात सापडले आहेत. या विद्यार्थी वाहतूकदारांना वाहनाचे हप्ते फेडण्याचीच चिंता पडली असल्याने त्यांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.
सर्व रिक्षाचालकांना मिळावी मदत
नाशिक : लॉकडाऊनच्या कालावधीत, तसेच त्यापूर्वीच्या काळातही रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे महानगरातील पंचवीस हजारांहून अधिक रिक्षाचालकांना त्यांच्या कुटुंबांचे पालनपोषण करणाऱ्या रिक्षाचालकांची कुटुंबे अडचणीत सापडले आहेत. भाडेतत्त्वावर गाडी चालविणाऱ्या चालकांची तर प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे सर्वच रिक्षाचालकांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
समांतर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे
नाशिक : मुंबई-आग्रा रस्त्याच्या सर्व्हिस रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येते. रस्त्याच्या अगदी मधोमध खड्डे पडल्याने नागरिकांना अपघाताची भीती वाटते. त्यामुळे या मार्गाची डागडुजी करावी, अशी मागणी सातत्याने होत असल्याने तातडीने रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
लघू व्यावसायिकांना आर्थिक मदतीची मागणी
नाशिक : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे शहरातील अनेक उद्योग, व्यवसाय संकटात सापडले आहेत. निर्बंध काहीसे शिथिल केले तरी त्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत. या संकटातून उभारी घेण्यासाठी सरकारने टपरीवजा लघू व्यावसायिकांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.