... तेव्हा मोदी भावूक झाल्यास आनंद होईल, अजित पवारांचा पंतप्रधानांना टोला

By महेश गलांडे | Published: February 10, 2021 04:16 PM2021-02-10T16:16:30+5:302021-02-10T16:18:33+5:30

नरेंद्र मोदी राज्यसभेत भावूक झाल्यानंतर सोशल मीडियातून अनेकांनी त्यांना ट्रोल केले. आता, अजित पवार यांनीही शेतकरी आंदोलनाचा मुद्दा धरुन मोदींना चिमटा काढला आहे.

I would be happy if Modi gets emotional then, said Ajit Pawar on rajya sabha | ... तेव्हा मोदी भावूक झाल्यास आनंद होईल, अजित पवारांचा पंतप्रधानांना टोला

... तेव्हा मोदी भावूक झाल्यास आनंद होईल, अजित पवारांचा पंतप्रधानांना टोला

Next
ठळक मुद्दे"पंतप्रधान राज्यसभेत गुलाम नबी आझादांच्या आठवणी सांगताना भावूक झाले, असेच ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भावूक झाले तर आनंद होईल."

मुंबई - सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणावर संबोधित केल्यानंतर मंगळवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेला संबोधित केले, काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यासह ४ खासदारांचा आज संसदेतला शेवटचा दिवस आहे, त्यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केले, त्याचसोबत आझाद यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात भावूक झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर, सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यावरुन अनेकांनी मिम्सही बनवले. आता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींच्या भावूक होण्यावरुन त्यांना टोला लगावलाय. 

नरेंद्र मोदी राज्यसभेत भावूक झाल्यानंतर सोशल मीडियातून अनेकांनी त्यांना ट्रोल केले. आता, अजित पवार यांनीही शेतकरी आंदोलनाचा मुद्दा धरुन मोदींना चिमटा काढला आहे. "पंतप्रधान राज्यसभेत गुलाम नबी आझादांच्या आठवणी सांगताना भावूक झाले, असेच ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भावूक झाले तर आनंद होईल." मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला. त्यावेळी गुलाम नबी आझादांच्या आठवणी सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पहायला मिळालं. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारुप आराखडा आढावा बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा आढावा घेतला. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्ह्यातील आमदार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

लोकलसंबंधी अजित पवार म्हणतात...

मुंबई लोकल सेवासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुंबई लोकल वेळ बदलाचा निर्णय टप्या टप्याने होणार आहे. यावर राज्य सरकार केंद्र सरकारच्या सूचनेनुसार काम करत आहे.

का झाले मोदी भावूक

एका दहशतवादी घटनेनंतर गुलाम नबी आझाद यांच्यासोबत फोनवरून झालेल्या संवादाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले, आझाद यांचं कौतुक करताना ते म्हणाले की, त्यांच्या घराच्या परिसरातील बगीचा पाहून काश्मीरची आठवण होते, गुजरातच्या पर्यटकांवर जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, तेव्हा सर्वात आधी गुलाम नबी आझाद यांचा फोन मला आला, तो फोन फक्त सूचना देण्यासाठी नव्हे तर त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, आपल्या कुटुंबातील सदस्यांची जशी चिंता असले तशी चिंता गुजरातच्या लोकांबद्दल आझाद यांना होती, असं मोदी म्हणाले.(PM Narendra Modi gets emotional while reminiscing an incident involving Congress leader Ghulam Nabi Azad)
 

Web Title: I would be happy if Modi gets emotional then, said Ajit Pawar on rajya sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.