प्रश्नांची उकल करताना जगणं राहून जातं....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 16:18 IST2018-11-28T16:18:17+5:302018-11-28T16:18:40+5:30
येवला : पूर्वीचे शिक्षण माणसाला शहाणे करायचे. आताचे शिक्षण माणसाला हुशार बनवते. अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाला मिळत नाही. मात्र काही प्रश्नांची उत्तरे अशी काही मजेशीर असतात की, या प्रश्नांचे उत्तर मी शोधलेच का? असा प्रश्न पडतो. मात्र प्रश्नांची उकल करताना जगणं राहून जातं, असे प्रतिपादन गझलकार, मुशायराकार सुरेशकुमार वैराळकर यांनी केले.

व्याख्यानमालेत गजलकार सुरेश वैराळकर यांचा सत्कार करताना उपस्थित मान्यवर
येवला :
पूर्वीचे शिक्षण माणसाला शहाणे करायचे. आताचे शिक्षण माणसाला हुशार बनवते. अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाला मिळत नाही. मात्र काही प्रश्नांची उत्तरे अशी काही मजेशीर असतात की, या प्रश्नांचे उत्तर मी शोधलेच का? असा प्रश्न पडतो. मात्र प्रश्नांची उकल करताना जगणं राहून जातं, असे प्रतिपादन गझलकार, मुशायराकार सुरेशकुमार वैराळकर यांनी केले.
व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शाहीर सुरेश कुमार वैराळकर यांनी गुंफले. यावेळी ते म्हणाले की, येवला पैठणी साठी जगात प्रसिद्ध आहे. पैठणी साठी कोरडे हवामान लागते. मात्र येवल्यातील वातावरण कोरडे असले तरी, येथील माणसं हृदयात ओलावा ठेवणारी आहेत, असे प्रतिपादन शाहीर, गझलकार, मुशायराकार सुरेशकुमार वैराळकर यांनी केले. जेव्हा लढाईचा खरा डँका झडायला लागला, तेव्हा जो तो आपल्या तंबूत दडायला लागला या गझल गीताने कार्यक्र माला सुरु वात झाली. आठही गझलकारांनी प्रत्येकी दोन दोन रचना सादर केल्या. या गझलांनी कार्यक्र म उत्तरोत्तर बहरत गेला. समता प्रतिष्ठान येवला आयोजित प्रागतिक विचार व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यापूर्वी ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या भक्ती गीतावर समता प्रतिष्ठान संचिलत मायबोली मूक बधिर विद्यालयातील विद्यार्थिनींनी समूह नृत्य सादर केले. यावेळी जेष्ठ नेते अंबादास बनकर, सुरेशकुमार वैराळकर, शरद धनगर, कमलाकर देसले, अमति वाघ, हेमलता पाटील, पुरु षोत्तम चंद्रात्रे, ज्ञानेश पाटील, गौरव आठवले, खालील मोमीन आदी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी टाकून आजच्या कार्यक्र माचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार मारोतराव पवार, गो. तु. पाटील, सुरेश कांबळे, विक्र म गायकवाड , दिलीप कुलकर्णी, अविनाश पाटील, सुधा कोकाटे, पुरु षोत्तम पाटील, सलील कोकाटे, दत्तात्रय चव्हाण, आजीज शेख, आदी उपस्थित होते.
प्रस्ताविक समता प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा अर्जुन कोकाटे यांनी केले. तर सूत्रसंचालन शिवाजी भालेराव यांनी केले. सर्व गझलकार पाहुण्यांचा परिचय कवी लक्ष्मण बारहाते यांनी करून दिला. आभार प्रदर्शन निर्मला गुंजाळ यांनी मानले.
व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी मनोहर पाचोरे, अजय विभांडीक, मुख्याध्यापक रामनाथ पाटील, पंडित मढवई, दिनकर दाणे, कानिफनाथ मढवई, बाबासाहेब कोकाटे, नवनाथ शिंदे, बी. सी. चव्हाण, भाऊसाहेब मगर आदि परिश्रम घेत आहे.