शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:38 IST

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर सिन्नरमध्ये शेतकऱ्यांची जमीन हडपल्याप्रकरणी १४ वा गुन्हा दाखल.

भोंदूगिरी, जादूटोणा आणि महिलांच्या लैंगिक शोषणाने महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या अशोक खरातचे कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे मंदिर उभारण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांची जमीन बळकावल्याप्रकरणी खरात आणि त्याची पत्नी कल्पना यांच्यावर सिन्नर पोलीस ठाण्यात १४ वा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैवी शक्तीची भीती आणि १६ एकर जमिनीचा मलिदा

समोर आलेल्या माहितीनुसार, २००३ ते २००४ दरम्यान अशोक खरातने मिरगाव येथील शेतकऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढले होते. "तुमच्या शेतात मंदिर उभारायचे आहे, माझ्याकडे मोठी दैवी शक्ती आहे," अशी बतावणी त्याने केली. जर मंदिर उभारणीला विरोध केला, तर "तुमच्यावर जादूटोणा करून सर्वांचा नाश करेन," अशी धमकी त्याने जमीन मालकांना दिली होती. याच भीतीपोटी खरात आणि त्याच्या पत्नीने अवघ्या १५ लाखांत तब्बल १६.५० एकर जमीन खरेदी केली. यामध्ये ईशान्येश्वर मंदिर, फार्म हाऊस आणि आंब्याच्या बागेचा समावेश असून ही सर्व मालमत्ता खरातने स्वतःच्या नावावर करून शेतकऱ्यांची मोठी लूट केली.

गरोदर महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचे फुटले बिंग

खरातचे पाप केवळ जमिनीच्या व्यवहारापुरते मर्यादित नाही. त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या ७ महिन्यांच्या गरोदर पत्नीवर त्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. "प्रसूती सुरळीत होईल आणि मुलगाच होईल," असे सांगून त्याने या महिलेचे लैंगिक शोषण केले. या अत्याचाराच्या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खरातचे खरे स्वरूप जगासमोर आले आणि त्याच्यावर गुन्ह्यांचा डोंगर उभा राहिला.

१०० रुपयांचे चिंचोके विकले लाखांत!

खरात हा भक्तांना कसा मूर्ख बनवत होता, याचेही पुरावे समोर आले आहेत. १०० रुपये किलोने मिळणारे चिंचोके चमत्कारी असल्याचे सांगून तो भक्तांना लाखांत विकत असे. तसेच नकली साप आणि वाघाच्या कातड्याचा वापर करून भाविकांमध्ये भीती निर्माण करायचा.

आज पुन्हा न्यायालयात हजेरी

दुसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपल्यानंतर, एसआयटीने आता तिसऱ्या गुन्ह्यात खरातचा ताबा घेतला आहे. एका महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. खरातवर आतापर्यंत लैंगिक शोषणाचे ८ गुन्हे दाखल असून, एकूण गुन्ह्यांची संख्या १४ वर पोहोचली आहे. पोलीस आता त्याच्या 'ओकस प्रॉपर्टी' कार्यालयातील पुराव्यांच्या आधारे अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake godman duped farmers, grabbed land; faces fourteenth charge.

Web Summary : Ashok Kharat, accused of fraud and sexual exploitation, faces a 14th charge for swindling farmers in Sinnar, seizing land under the guise of building a temple. He allegedly threatened them with black magic, acquiring 16 acres for a pittance and exploiting a pregnant woman.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी