शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मला सासरच्यांनी जाळले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:14 IST

शहरातील पिंपळेश्वर रोड परिसरात २३ मार्चच्या रात्री घडलेल्या विवाहिता जळीतकांड प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. गर्भपात करत नाही म्हणून नवरा, दीर आणि सासरा यांनी संगनमत करून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा आरोप करत संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिलेल्या रूपाली विलास कुमावत या महिलेने आता असे काहीच घडले नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि  सटाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सटाणा : शहरातील पिंपळेश्वर रोड परिसरात २३ मार्चच्या रात्री घडलेल्या विवाहिता जळीतकांड प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. गर्भपात करत नाही म्हणून नवरा, दीर आणि सासरा यांनी संगनमत करून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा आरोप करत संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिलेल्या रूपाली विलास कुमावत या महिलेने आता असे काहीच घडले नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि  सटाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे पोलीसही आता बुचकळ्यात पडले आहेत. नवरा, दीर आणि सासरा यांचा या प्रकरणात काहीही सबंध नसून स्वयंपाक करत असताना माझ्या साडीचा पदर गॅसला लागल्याने हा प्रकार घडल्याचे तिने आता म्हटले आहे. माझा जबाब पुन्हा पोलिसांनी नोंदवून घ्यावा, अशी मागणीही रूपाली कुमावत हिने केली असून कोर्ट कचेरीच्या फंदात पडण्याची माझी इच्छा नसल्याचे तिने निवेदनात म्हटले आहे. २३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास रूपाली विलास कुमावत ही महिला गंभीर भाजली होती. तिच्या आईने तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करून रूपालीने गर्भपात करण्यासाठी नकार दिल्याचा राग आल्याने नवरा विलास कुमावत, दीर योगेश कुमावत आणि सासरा दशरथ कुमावत यांनी अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची फिर्याद दिल्याने राज्यभर या प्रकरणाची चर्चा सुरु होती. या प्रकरणातील तीनही आरोपी फरार असतांना पीडित रूपाली कुमावत हिने या प्रकरणी गौप्यस्फोट केला आहे.माझ्या जळण्याचा आणि पती, दीर आणि सासरा यांचा सबंध नसून मी गॅसवर स्वयंपाक करतांना माझ्या साडीचा पदर गॅसला लागला. साडी पेटल्याचे पाहून मी पळत पळत गल्लीत आल्याने हवेने साडीने पेट घेतला माझ्या आईने मला विझवील्याचेही निवेदनात म्हटले आहे. माझे पती आणि सासरा माझा व्यवस्थित सांभाळ करत असून उपचारासाठीदेखील ते सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, असे तिने निवेदनात म्हटले आहे.पोलिसांच्या भूमिकेकडे लक्षमाझ्या मुलीची अशी घटना घडल्यानंतरदेखील तिचा पती घटनास्थळी लवकर आला नाही म्हणून रागाच्या भरात तिने त्यांनीच हे कृत्य केल्याची फिर्याद पोलिसांना दिली असल्याचे रूपाली कुमावतच्या आईने म्हटले असून, तिचा पती, सासरा सासू रूपालीचा काळजीपूर्वक सांभाळ करत असल्याची प्रतिक्रिया रूपालीची आई आक्काबाई हीने दिली आहे. आता या प्रकरणात पोलिस काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा