येवल्यात कांद्याची विक्र मी आवक
By Admin | Updated: March 4, 2017 00:28 IST2017-03-04T00:27:50+5:302017-03-04T00:28:05+5:30
येवला : येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर शुक्र वारी गुरु वारी ११०० ट्रॅक्टर व ६५० पिकअपमधून कांद्याची सुमारे४५ हजार क्विंटल आवक झाली.

येवल्यात कांद्याची विक्र मी आवक
येवला : येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर शुक्र वारी गुरु वारी ११०० ट्रॅक्टर व ६५० पिकअपमधून कांद्याची सुमारे४५ हजार क्विंटल आवक झाली. येवला कांदा बाजारआवारात किमान दर २५० ते ५४३ रुपयेपर्यंत होते आणि सरासरी भाव ५०० रुपये प्रतिक्विंटल होते. उपबाजार अंदरसूल यार्डमध्ये लाल कांद्याचे भाव किमान २५० रु पये ते कमाल ५७५ आणि सरासरी ४९० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव डी.सी. खैरनार यांनी दिली.
कांद्याचे बाजारभाव पुन्हा घसरत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लाल पोळ कांदा व रांगडा कांदा दोन्हीचे विक्रमी उत्पादन तालुक्यात झाल्याने मोठ्या प्रमाणावर कांदा मार्केटला येत आहे. परंतु कांद्याच्या भावात सारखा चढउतार चालू आहे. तालुक्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असल्याने कांद्याची प्रचंड आवक सुरु आहे. निवडणूक पर्व, महाशिवरात्री यामुळे बंद असलेले कांदा मार्केट पुन्हा जोमाने सुरू झाले. सोमवारपासून पुन्हा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कांद्याची प्रतदेखील घसरत चालली आहे. पुढे होळी आणि मार्च अखेरमुळे मार्केट बंदचा फटका बसण्याअगोदर शेतकरी कांदा मार्केटला आणण्याची घाई करीत आहे. गुरु वारी येवला कांदा बाजार आवार पूर्णपणे ट्रँक्टरने भरला होता. चोहीकडे कांदाच कांदा असे चित्र होते. त्यामुळे गुरु वारी सायंकाळी ७ वाजताच मार्केटचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. संतोषीमाता मंदिराच्या खुल्या जागेत सुमारे ४०० ट्रँक्टर लागले होते. शुक्रवारी उशिरापर्यंत कांद्याचे लिलाव चालले तरी संपूर्ण लिलाव होण्याची शक्यता नसल्याचे बाजार समितीचे म्हणणे आहे. (वार्ताहर)