शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांना भरली हुडहुडी; पारा १०.६ अंशापर्यंत घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 14:41 IST

शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. किमान तापमानाचा पाराही आता वेगाने घसरु लागला आहे. १६ अंशांच्या जवळपास स्थिरावणारा पारा आता या आठवड्यात थेट १० अंशापर्यंत खाली आल्यामुळे दिपावलीच्या तोंडावर शहरात थंडीचा मुक्काम

ठळक मुद्देशहर हरविले धु्क्यातजॉगर्सचा उत्साह वृध्दींगत

नाशिक : शहर व परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. बुधवारी (दि.११) शहराच्या किमान तापमानाचा पारा थेट १०.६अंशापर्यंत घसरला. नाशिककरांना पहाटेपासूनच थंडीची तीव्रता जाणवयास लागली होती. सकाळी आठ वाजेपर्यंत शहर धुक्यात हरविले होते. थंडीची तीव्रता वाढताच जॉगर्सचा उत्साही सळसळू लागला असून सकाळी फेरफटका मारणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे बुधवारी पहावयास मिळाले.शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. किमान तापमानाचा पाराही आता वेगाने घसरु लागला आहे. १६ अंशांच्या जवळपास स्थिरावणारा पारा आता या आठवड्यात थेट १० अंशापर्यंत खाली आल्यामुळे दिपावलीच्या तोंडावर शहरात थंडीचा मुक्काम राहणार आहे. थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिकांनी उबदार कपडे आता अडगळीतून बाहेर काढले आहे. ऊबदार कपड्यांवरील धुळ झटकत त्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. उबदार कपड्यांद्वारे थंडीच्या तीव्रतेपासून स्वत:चा बचाव करताना नाशिककर नजरेस पडू लागले आहे. यावर्षी पावसाळा लांबल्याने थंडीचे आगमनदेखील उशिराने होईल, असे वाटत होते; मात्र अचानकपणे थंडीची चाहूल या महिन्यात नागरिकांना जाणवू लागली आणि एक आठवडा उलटत नाही तोच पारा थेट १० अंशापर्यंत खाली आला. यामुळे थंडीचा कडाका चांगलाच जाणवला. किमान तापमानासह कमाल तापमानही मंगळवारपासून घसरताना दिसत आहे.

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानTemperatureतापमान