हुसेनी बाबा यांचा ‘संदल-ए-खास’ साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:16 IST2021-07-27T04:16:03+5:302021-07-27T04:16:03+5:30
दरवर्षी जिलहिज्जा या अरबी महिन्यात १६ तारखेला हुसेनी बाबा यांचा संदल-ए-खास साजरा केला जातो. सालाबादप्रमाणे यावर्षीही सोमवारी संदल उत्साहात ...

हुसेनी बाबा यांचा ‘संदल-ए-खास’ साधेपणाने
दरवर्षी जिलहिज्जा या अरबी महिन्यात १६ तारखेला हुसेनी बाबा यांचा संदल-ए-खास साजरा केला जातो. सालाबादप्रमाणे यावर्षीही सोमवारी संदल उत्साहात मात्र साधेपणाने व कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करत मोजक्याच प्रमुख विश्वस्त मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
दरम्यान, बडी दर्गाबाहेर भाविकांनी संध्याकाळी हजेरी लावत करोनामुक्तीसाठी विशेष दुआ मागितली. विश्वस्तांच्या हस्ते परंपरेनुसार धार्मिक विधी पार पडला. यावेळी फातिहापठन व दरुदोसलामचे पठन करण्यात आले. तसेच मुस्लीम बांधवांनी आपापल्या घरांमध्ये गोड खाद्यपदार्थ तयार करत हुसेनी बाबा यांच्या संदलच्या औचित्यावर फातीहापठन केले. कोरोनामुळे दर्गाचा संदलोत्सव यावर्षीही सामूहिक स्वरूपात साजरा केला जाणार नसल्याचे हाजी वसीम पीरजादा यांनी अधिकृतरीत्या दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. तसेच मुस्लीम तरुणांनी सोशल मीडियावर बडी दर्गाचे व्हिडिओ, छायाचित्रे पोस्ट करत ‘संदल-ए-खास मुबारक’ अशा शुभेच्छा दिल्या. दर्गा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
260721\26nsk_43_26072021_13.jpg
बडी दर्गा शरीफ