पतीच्या श्रीमुखात भडकावली; पत्नीला दंड
By Admin | Updated: September 19, 2016 00:10 IST2016-09-19T00:09:51+5:302016-09-19T00:10:33+5:30
पतीच्या श्रीमुखात भडकावली; पत्नीला दंड

पतीच्या श्रीमुखात भडकावली; पत्नीला दंड
नाशिकरोड : नाशिकरोड कौटुंबिक न्यायालयात पती-पत्नी दोघांच्या संमतीच्या फारकतीच्या निकालानंतर न्यायालयाच्या आवारातच संबंधित महिलेने फारकत झालेल्या पतीच्या श्रीमुखात भडकावल्याने त्या महिलेस न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड केला. कौटुंबिक न्यायालयात लोकेश ढगे व पत्नी अनमोल ढगे यांच्यात फारकतीचा दावा सुरू होता. न्यायमूर्ती कविता ठाकूर यांनी निकाल दिला. त्यापोटी अनमोल ढगे हिला पती लोकेश ढगे यांच्याकडून चार लाखांचा डिमांड ड्राफ्ट देण्यात आला. त्यानंतर संतप्त झालेल्या अनमोल हिने फारकत घेतलेला पती लोकेशला तू आयुष्य उद्ध्वस्त केले असे म्हणत आवारातच त्याच्या श्रीमुखात भडकावली. या घटनेची गंभीर दखल घेत न्यायालयाने पत्नीस पाच हजार रुपये दंड व सायंकाळपर्यंत न्यायालयात बसून राहण्याची शिक्षा केली.