पती, मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:02+5:302021-05-10T04:14:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पंचवटी : मखमलाबाद परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय विवाहितेच्या घरात बळजबरीने प्रवेश करत तिच्या पतीला व ...

पती, मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : मखमलाबाद परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय विवाहितेच्या घरात बळजबरीने प्रवेश करत तिच्या पतीला व मुलाला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मालेगाव येथील संशयित जयघोष तुकाराम बागुल याच्याविरुद्ध अत्याचारासह विनयभंग केल्याचा गुन्हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
दीड वर्षांपूर्वी संशयित आरोपी बागुल हा पीडित महिला राहात असलेल्या घरात बळजबरीने शिरला होता व त्याने महिलेला शिवीगाळ, मारहाण करून जबरदस्तीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध निर्माण करत अत्याचार केला होता. त्यानंतर गेल्या फेब्रुवारी महिन्यात संशयित पुन्हा पीडितेच्या घरी आला व त्याने अंगलट करत तिचा पुन्हा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस तपास करत असून, संशयित आरोपी बागुल हा पसार झाला आहे.