नाशिक : स्वत:च्या पत्नीच्या चारित्र्याच्या संशय घेत पतीने लोखंडी फावडा डोक्यात मारून पत्नीचा निघृणपणे खून केल्याची घटना शनिवारी (दि.२५) रात्रीच्या सुमारास नाणेगाव परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याने घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करत संशयित पती हिरामण निवृत्ती बेंडकुळे (३०,रा. जयभवानीनगर) यास बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.नाणेगाव शिवारातील जयभवानीनगर भागात मोलमजूरी करून उदरनिर्वाह करणारे बेंडकुळे कुटुंब आपल्या दोन मुलांसह वास्तव्यास होते. संशयित हिरामण याने त्याची पत्नी काजल हिरामण बेंडकूळे (२६) हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत तीच्यासोबत शनिवारी भांडण करत मनात राग धरून लोखंडी फावड्याने डोक्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात काजल गंभीर जखमी झाल्याने जागेवरच मृत्यूमुखी पडली. खून झाल्याची घटना तत्काळ उघडकीस आली व नाणेगावातील रहिवाशांची जयभवानीनगरमध्ये गर्दी लोटली. पोलीस पाटलाकडून तत्काळ देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याला माहिती कळविण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. फरार झालेल्या हिरामणला अवघ्या काही तासांत देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.२७) पोलीस कोठडी सुनावली होती. काजलच्या पश्चात आई, वडील, दोन मुले, सासू, सासरे असा परिवार आहे. याबाबत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला फावडादेखील जप्त केला असून पुढील तपास सहायक निरिक्षक राहूल मोरे हे करीत आहेत.
लोखंडी फावडा डोक्यात मारून पतीने केली पत्नीची हत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 13:46 IST
फरार झालेल्या हिरामणला अवघ्या काही तासांत देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.२७) पोलीस कोठडी सुनावली होती.
लोखंडी फावडा डोक्यात मारून पतीने केली पत्नीची हत्त्या
ठळक मुद्देमाहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेन्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती