पत्नीला पेटवून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:15 IST2021-03-21T04:15:19+5:302021-03-21T04:15:19+5:30

ध्रुवनगर भागातील एका बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी मजुरी करत तेथील खोलीत राहणाऱ्या मुळच्या नेपाळ येथील एका दाम्पत्यामध्ये वारंवार खटके उडत ...

Husband beaten to death by wife | पत्नीला पेटवून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप

पत्नीला पेटवून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप

ध्रुवनगर भागातील एका बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी मजुरी करत तेथील खोलीत राहणाऱ्या मुळच्या नेपाळ येथील एका दाम्पत्यामध्ये वारंवार खटके उडत होते. आरोपी समशेर याने त्याची पत्नी आयशासोबत जोरदार भांडण करत तिच्या अंगावर १२ जून २०१८साली ज्वलनशील पदार्थ ओतून जीवंत पेटवून दिले होते. या घटनेत आयशा गंभीररित्या भाजल्याने तीचा मृत्यु झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी तिचा पती समशेर यास अटक करत त्याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा सखोल तपास तत्कालीन पोलीस निरिक्षक किशोर मोरे यांनी करत त्याच्याविरुध्द सबळ पुरावे जमा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्याचा खटला वाघवसे यांच्या न्यायालयात सुरु होता. शनिवारी या खटल्यावर अंतीम सुनावणी झाली. यावेळी न्यायालयात सरकारी वकिल शिरिष कडवे यांनी सबळ साक्ष, पुरावे सादर केले. या पुराव्यांनुसार समशेर याने पत्नीला जीवंत जाळून ठार मारल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी धरले. त्यास जन्मठेप व १ हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिन्यांचा सश्रम कारावास

अशी शिक्षा सुनावली.

Web Title: Husband beaten to death by wife