लोकमत न्युज नेटवर्कवणी : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडा येथुन वणी येथे येणार्या दुचाकीला भरधाव वेगातील पिकअप जीपने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील पती पत्नी ठार झाले असुन वणी दिंडोरी रस्त्यावरील ओझरखेड का?लनीलगत असलेल्या परिसरात दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.याबाबत माहीती अशी सुधाकर रामराव महाले (४२) व त्यांची पत्नी संगीता सुधाकर महाले (३८) हे दुचाकीवरु न वणी येथुन दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडा येथे गेले होते. परीचीत व्यक्तीचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती. त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी हे दाम्पत्य गेले होते तेथुन ते वणी येथे आपल्या घराकडे येण्यासाठी दुचाकीवरु न परतीचा प्रवास करत असताना दिंडोरीकडुन वणी बाजुकडे येत होते. ओझरखेड कॉलनीच्या पुढे भंगार दुकानाजवळ त्यावेळी भरधाव वेगातील पिकअप जीप आली व पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटले व पिकअपने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य यांना गंभीर स्वरु पाचा मार लागला व झालेल्या भीषण अपघातात पती पत्नी यांचा दूर्दैवी अंत झाला. अपघातात दुचाकीचे नुकसान झाले तर पिकअप चालकाच्या हयगयीमुळे दाम्पत्याला जीव गमवावा लागला अपघातानंतर पोलीसांनी पिकअप ताब्यात घेतली असुन याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीला पिकअपची धडक अपघातात पती पत्नी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 19:18 IST
वणी : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडा येथुन वणी येथे येणार्या दुचाकीला भरधाव वेगातील पिकअप जीपने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील पती पत्नी ठार झाले असुन वणी दिंडोरी रस्त्यावरील ओझरखेड का?लनीलगत असलेल्या परिसरात दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.
दुचाकीला पिकअपची धडक अपघातात पती पत्नी ठार
ठळक मुद्देअपघातानंतर पोलीसांनी पिकअप ताब्यात घेतली