शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शाळांकडून विद्यार्थ्यांची शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:45 IST

खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालक व विद्यार्थ्यांचा वाढता कल आणि खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे घटत चाललेले प्रमाण यामुळे विविध शाळांकडून विद्यार्थ्यांची शोधाशोध सुरू आहे.

नाशिक : खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालक व विद्यार्थ्यांचा वाढता कल आणि खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे घटत चाललेले प्रमाण यामुळे विविध शाळांकडून विद्यार्थ्यांची शोधाशोध सुरू आहे.विशेष म्हणजे अशा शाळांनी उन्हाळी सुट्यांमध्ये शिक्षकांवर विद्यार्थी शोधण्याची कामगिरी सोपविली असून, आगामी शैक्षणिक वर्षात नोकरी टिकवायची असेल, तर निश्चित करून दिलेल्या किमान विद्यार्थ्यांचा प्रवेश करून घ्या, असा अलिखित आदेशत काही खासगी शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षकांना दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये शाळेसाठी प्रवेश मिळविण्यासाठी चुरस दिसून येत असून, शाळेच्या परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन विद्यार्थ्यांचा शोध घेण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.शिक्षण शास्त्रातील पदविका व पदवी (डी.एड., बी.एड.) झाल्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी मिळालेली अल्पवेतनाची अथवा मानधनाची नोकरी टिकविण्यासाठी शालेय शिक्षकांना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागत आहे. नोकरीच्या भीतीने शहरासह ग्रामीण भागातील खासगी शाळांच्या शिक्षकांना रणरणत्या उन्हात विद्यार्थ्यांची शोधाशोध करावी लागते आहे. विशेष म्हणजे खासगी शाळा या पूर्णपणे विद्यार्थ्यांकडून मिळाव्या शुल्कावर सुरू असल्याने शिक्षकांचे वेतन अथवा मानधनही यातूनच मिळते त्यामुळे विद्यार्थ्यांची शोधाशोध करून शाळांमध्ये प्रवेश मिळविणे ही शिक्षकांची अपरिहार्यता झाली आहे.विद्यार्थ्यांचा तुटवडामागील दहा, पंधरा वर्षांपासून डी.एड.ची पदवी घेणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहेत. त्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये भरतीच्या जागा अगदी शेकडोच्या घरात असल्याने पदवी घेतलेले हे लाखो शिक्षक नाईलाजाने खासगी शाळांमध्ये नोकरी करतात, तर दुसरीकडे गल्लीबोळात खासगी शाळांचे पेव फुटल्याने विद्यार्थ्यांची विभागणी होत आहे. विद्यार्थींच्या पटसंख्या टिकवण्यासाठी शाळांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यामुळे संस्थाचालकांना शिक्षक उपलब्ध होत असले तरी विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागत आहे.यात ग्रामीण भागात या शिक्षकांना काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी शहरात शाळांची संख्या अधिक असल्याने अनेक पर्याय तसेच बहुतांश शाळांचे शुल्क पालकांना झेपणारे नसल्याने शिक्षकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकांत नाराजी दिसत होती़

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी