त्र्यंबकला दर्शनासाठी लाखो भाविकांची परवड
By Admin | Updated: September 14, 2015 22:54 IST2015-09-14T22:53:37+5:302015-09-14T22:54:07+5:30
त्र्यंबकला दर्शनासाठी लाखो भाविकांची परवड

त्र्यंबकला दर्शनासाठी लाखो भाविकांची परवड
त्र्यंबकेश्वर : रविवारी दुसऱ्या पर्वणीनंतर सोमवारी कुशावर्तात स्नान करण्यासाठी आणि भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन करण्यासाठी दाखल होणाऱ्या लाखो भाविकांचे नियोजनाअभावी हाल होत आहे. दर्शनासाठी भलीमोठी रांग लागत असताना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मात्र रोजच्या वेळेतच मंदिर बंद करीत असल्याने भाविकांची निराशा होत आहे. देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंदिर उघडे ठेवण्याची वेळ वाढविण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी दिली. मात्र मंदिर व्यवस्थापन, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयाअभावी रात्री उशिरापर्यंत भाविकांची परवड सुरू होती.