जिल्ह्यातील शेकडो रिक्षाचालक अपात्र
By Admin | Updated: May 28, 2014 00:19 IST2014-05-28T00:19:04+5:302014-05-28T00:19:04+5:30
किशोर इंदोरकर ल्ल मालेगाव कॅम्प आॅनलाइन रिक्षापरवान्यासाठी काढण्यात आलेल्या लॉटरीच्या सोडतीत जिल्ह्यातील शेकडो रिक्षाचालक अपात्र ठरले

जिल्ह्यातील शेकडो रिक्षाचालक अपात्र
किशोर इंदोरकर ल्ल मालेगाव कॅम्प आॅनलाइन रिक्षापरवान्यासाठी काढण्यात आलेल्या लॉटरीच्या सोडतीत जिल्ह्यातील शेकडो रिक्षाचालक अपात्र ठरले असून, ‘आॅनलाइन’पध्दतीत सावळा गोंधळ झाल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केला आहे. राज्य शासनाच्या मोटार वाहन विभागाच्यावतीने जानेवारी २०१४ मध्ये आॅनलाइन रिक्षापरवाना मिळविण्यासाठी राज्यभरातील रिक्षाचालकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी मालेगावसह जिल्ह्यातून १७०० अर्ज दाखल झाले होते. अर्जाच्या छाननीमध्ये जवळपास ४७५ अर्जदार अपात्र ठरले. अर्ज केल्याच्या तारखेस आॅटोरिक्षा अनुज्ञप्ती (परवाना) नाही, रिक्षाचा बिल्ला (बॅच) नाही, शैक्षणिक पात्रता अर्जात नमूद नाही, रिक्षाचा बिल्ला इतर ठिकाणच्या कार्यालयाने जारी करणे, कार्यालयीन अभिलेखानुसार आपल्या नावाने आॅटोरिक्षा अथवा टॅक्सीचा पूर्वी परवाना असणे अशीे कारणे देण्यात आली आहेत. त्यामुळे काही रिक्षाचालकांचे अर्ज यामध्ये बाद ठरले. संबंधीत अर्जदारांना पत्र पाठवून त्याबाबत कळवण्यात आले; मात्र अर्जात कुठलाही कमतरता नसताना आमचे अर्ज अपात्र ठरवल्याचे या अर्जदारांचे म्हणणे आहे; काहींनी तर आॅनलाइन प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. आम्हाला याबाबत योग्य तो न्याय मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे.