दुकानाचे शटर वाकवून दीड लाखांची घरफोडी
By Admin | Updated: January 31, 2016 23:41 IST2016-01-31T23:37:37+5:302016-01-31T23:41:36+5:30
दुकानाचे शटर वाकवून दीड लाखांची घरफोडी

दुकानाचे शटर वाकवून दीड लाखांची घरफोडी
नाशिक : दुकानाचे शटर उचकटून रोख रकमेसह दुकानातील दीड रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़३१) पहाटेच्या सुमारास भद्रकालीतील दूध बाजारजवळ घडली़ रफिक मजिद मेमन (५०, रा़ दूध बाजार, नाशिक) यांचे जनता सुपारी स्टोअर्स नावाचे दुकान आहे़ या दुकानाचे शटर उचकटून दुकारातील ७० हजार रु पये रोख व ९० हजार रुपयांची सिगारेटची पाकिटे चोरट्यांनी चोरून नेली़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)