शंभरफुटी रस्ता हगणदारीमुक्तच्या वाटेवर

By Admin | Updated: July 24, 2016 23:48 IST2016-07-24T23:42:21+5:302016-07-24T23:48:01+5:30

स्वच्छ भारत अभियान : राजीवनगर झोपडपट्टीत शौचालय उभारणी

A hundred-futura road is on the road to freezing | शंभरफुटी रस्ता हगणदारीमुक्तच्या वाटेवर

शंभरफुटी रस्ता हगणदारीमुक्तच्या वाटेवर

संजय शहाणे नाशिक
काही महिन्यांपूर्वी राजीवनगर झोपडपट्टीलगतच्या शंभरफुटी रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नाक दाबून पुढे जावे लागायचे, हा अनुभव तेथून जाणाऱ्या प्रत्येकालाच यायचा. रस्त्याच्या दुतर्फा झोपडपट्टीतील रहिवाशांनी हगणदारी बनवल्याने दुर्गंधी सहन करण्यापलीकडे गेली होती. मात्र आता शंभरफुटी रस्ता हगणदारीमुक्त होण्याच्या वाटेवर आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राजीवनगर झोपडपट्टीतील ६५0 रहिवाशांपैकी ६00 रहिवाशांनी शौचालय बांधण्यासाठी अनुदानासाठी अर्ज केला असून, पहिल्या टप्प्यात १२७ रहिवाशांना शौचालय उभारणीसाठी सहा हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे. त्यापैकी १00 रहिवाशांनी शौचालय बांधले असल्याने त्यांना दुसऱ्या टप्प्याचे शौचालय बांधल्याचे छायाचित्र संबंधित विभागाकडे सादर केल्यावर सहा हजार रुपये मिळणार आहेत. असे प्रत्येक रहिवाशाला १२ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टीतील रहिवासी शौचविधीसाठी परिसरातील मोकळ्या भूखंडाचा वापर करत होते. परंतु भूखंड मालकाने संरक्षक भिंत बांधून जागा बंदिस्त केल्याने रहिवाशांची अडचण झाली. त्यामुळे रहिवाशांनी आपला मोर्चा रस्त्याकडे वळविला. शौचविधीसाठी सर्रासपणे शंभरफुटी रस्त्याच्या दुतर्फा जागेचा वापर होऊ लागला. रहिवाशांच्या शौचालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. परंतु त्यात यश येत नव्हते. दरम्यान, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणीचा कार्यक्रम महापालिकेने हाती घेतला आणि स्थानिक नगरसेवक सतीश सोनवणे यांनी राजीवनगर झोपडपट्टी हगणदारीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. आता दुसऱ्या टप्प्यात ४७३ रहिवाशांना पहिला टप्प्याचे सहा हजाराचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे घरघरात शौचालय उभारण्यात येत असल्याने येत्या काही दिवसांतच शंभरफुटी रस्ता हगणदारीमुक्त होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Web Title: A hundred-futura road is on the road to freezing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.