शंभर फुटी रस्ता होणार हगणदारी

By Admin | Updated: May 26, 2016 22:27 IST2016-05-26T22:21:08+5:302016-05-26T22:27:54+5:30

मुक्तस्वच्छ भारत अभियान : राजीवनगर झोपडपट्टीत शौचालय उभारणी

A hundred-foot road will go to the Shergill | शंभर फुटी रस्ता होणार हगणदारी

शंभर फुटी रस्ता होणार हगणदारी

 संजय शहाणे  इंदिरानगर
राजीवनगर झोपडपट्टीलगतच्या शंभर फुटी रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नाक दाबूनच पुढे जायचे, हा अनुभव तेथून जाणाऱ्या प्रत्येकाचाच. रस्त्याच्या दुतर्फा झोपडपट्टीतील रहिवाशांनी हगणदारीच बनवल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करण्यापलीकडचा. मात्र, आता हा शंभर फुटी रस्ता लवकरच हगणदारीमुक्त होणार असून, स्वच्छ भारत अभियानांतर्गत राजीवनगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी शौचालय उभारणीला प्रतिसाद दिला आहे.पहिल्या टप्प्यात सुमारे १५० रहिवाशांना शौचालय उभारणीसाठी अनुदान देण्यात आले आहे, तर सर्वच्या सर्व ७५० झोपडीधारकांनाही या अभियानात सामील करून घेतले जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टीतील रहिवासी शौचविधीसाठी परिसरातील मोकळ्या भूखंडाचा वापर करत होते. परंतु भूखंडमालकाने संरक्षण भिंत बांधून जागा बंदिस्त केल्याने रहिवाशांची अडचण झाली. त्यामुळे रहिवाशांनी आपला मोर्चा रस्त्याकडे वळविला. शौचविधीसाठी शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा जागेचा सर्रास वापर होऊ लागला. रहिवाशांचा शौचालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले; परंतु त्यात यश येत नव्हते. दरम्यान, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणीचा कार्यक्रम महापालिकेने हाती घेतला आणि स्थानिक नगरसेवक सतीश सोनवणे यांनी राजीवनगर झोपडपट्टी परिसर हगणदारीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. पहिल्या टप्प्यात सुमारे १५० रहिवाशांकडून आवश्यक ती कागदपत्रे घेत त्यांना शौचालय उभारण्यासाठी ६ हजार रुपयांचा पहिला हप्ता अदा करण्यात आला. आता सदर रहिवाशांनी शौचालय बांधण्याचे काम हाती घेतले असून, त्याच्या पूर्णत्वानंतर त्यांना पुढचा ६ हजारांचा हप्ता दिला जाणार आहे. उर्वरित झोपडीधारकांनाही शौचालय उभारणीसाठी प्रवृत्त केले जात असून, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: A hundred-foot road will go to the Shergill