घरफोडीत दीड लाखांचा ऐवज लंपास

By Admin | Updated: December 17, 2015 00:47 IST2015-12-17T00:46:33+5:302015-12-17T00:47:33+5:30

गंगापूररोड परिसरातील घटना

Hundred and a half million lapses | घरफोडीत दीड लाखांचा ऐवज लंपास

घरफोडीत दीड लाखांचा ऐवज लंपास

नाशिक : बंद घराच्या स्वयंपाकगृहाचे ग्रील तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गंगापूररोड परिसरात घडली आहे़
दत्तराज सोसायटीत राहणाऱ्या सरिता किशोर कापडणे या १२ ते १५ डिसेंबर या कालावधीत बाहेरगावी गेल्या होत्या़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या स्वयंपाकगृहात प्रवेश करून घरातील एक लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले़ या प्रकरणी कापडणे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Hundred and a half million lapses