शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मानवी ढवळाढवळ गंगापूरच्या पक्षी जीवनाला घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:40 IST

नाशिक : गंगापूर धरण परिसरातील वृक्षसंपदा व गवताळ प्रदेश हा विविध प्रकारच्या दुर्मिळ पक्ष्यांसाठी नैसिर्गक नंदनवन आहे. या परिसराला पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास क्षेत्र असा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बर्डलाईफ या संस्थेकडून सात वर्षांपूर्वी देण्यात आला आहे. या क्षेत्रात मागील काही मिहन्यांपासून मानवी ढवळाढवळ भूतदयेतून होऊ लागल्याने कावळ्यांची भरमसाठ वाढलेली संख्या तेथील नैसिर्गक जैवविविधतेमध्ये असंतुलन निर्माण करणारी ठरत असल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देअन्नसाखळी होतेय असंतुलित : गाठी शेव, चिवडा, बिस्किटे कावळ्यासाठी हानिकारक

अझहर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गंगापूरधरण परिसरातील वृक्षसंपदा व गवताळ प्रदेश हा विविध प्रकारच्या दुर्मिळ पक्ष्यांसाठी नैसिर्गक नंदनवन आहे. या परिसराला पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास क्षेत्र असा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बर्डलाईफ या संस्थेकडून सात वर्षांपूर्वी देण्यात आला आहे. या क्षेत्रात मागील काही मिहन्यांपासून मानवी ढवळाढवळ भूतदयेतून होऊ लागल्याने कावळ्यांची भरमसाठ वाढलेली संख्या तेथील नैसिर्गक जैवविविधतेमध्ये असंतुलन निर्माण करणारी ठरत असल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे.गंगापूरधरण क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जलसंपदा विभागाकडून घोषित करण्यात आलेले आहे तरीदेखील काही हौशी लोक पर्यटनाच्या निमित्ताने चोरट्या मार्ग द्वारे या भागात प्रवेश करतात यावेळी फोटोसेशन करताना आपल्याजवळील मानवी खाद्यपदार्थ तेलकट शेवचिवडा, वेफर्स, गाठी शेव, बिस्किटे यांसारखी खाद्यपदार्थ येथील कावळ्यांना खाद्य म्हणून पुरवितात;मात्र हे मानवी खाद्य कावळ्याचे अजिबात नाही, हे लक्षात घेण्याची गरज आहे. या परिसराला महत्वाचे अधिवास स्थळ दर्जा मिळवून देण्यासाठी दिवंगत निसर्ग अभ्यासक व नेचर कॉन्सरवेशन सोसायटी आॅफ नाशिकचे संस्थापक विश्वरूप राहा यांनी विशेष प्रयत्न केले होते.गंगापूर धरणाच्या भिंती वरून मार्गस्थ होताना आजूबाजूला असलेल्या गवताळ प्रदेश व वृक्षसंपदेच्या सानिध्यात विविध प्रकारच्या पक्षी जीवन बहरलेले दिसून येते. या भागात स्थलांतरित पक्षी गवताळ प्रदेशात आढळणारे दुर्मिळ पक्षी हे घरटी करून वास्तव्यास आहे या पक्षांकडून जमिनीवर अंडी घातली जातात मात्र या पक्ष्यांची संख्या कावळ्यांची वाढत्या भरमसाठ संख्येमुळे धोक्यात आली आहे कावळा हा पक्षी इतर पक्ष्यांच्या घरट्यांचे वर हल्ले करतो आण ित्यांची अंडी देखील नष्ट करतो त्यामुळे या भागात कावळ्यांची वाढती संख्या पक्षी जीवनासाठी हात धरू लागली आहे नैसिर्गक जैवविविधतेची अन्नसाखळी संतुलित ठेवण्यासाठी केवळ एका प्रजातीच्या पक्ष्यांची वाढती संख्या पूरक ठरू शकत नाही त्यामुळे नागरिकांनी या भागातील कावळ्यांना सहजरीत्या खाद्यपदार्थ उपलब्ध करून देऊ नये, जेणेकरून गंगापूर क्षेत्रातील नैसिर्गक जैवविविधता अधिक समृद्ध होईल असे एनसीएसएनच्या पक्षीनिरीक्षक पूजा कोठुळे यांचे सांगितले.असे आहे गंगापूरचे पक्षी जीवनपानस्थळ जागेत आढळणारे उघड्या चोचीचा बलाक, मोठा रोहित (फ्लेमिंगो) शराटी, शेकाट्या, विविध प्रकारचे बदक, जलाशय काठावरील लहान पक्षी, मोर, चंडोल, माळिटटवी, हरियाल, गरु ड, सुगरण, स्वर्गीयनर्तक, हळद्या, खंड्या, जंगली मैना, भारद्वाज, लाजरी पाणकोंबडी, वेडा राघू, निलपंख, कापशी घार, किरपोपट, गांधारी, दयाळ, टोईपोपट, हुदहुद, पंकोळी, तारवाली भिंगरी, पांढरा धोबी, पिवळा धोबी, माळिभंगरी यांच्यासह तब्बल दीडशे पक्ष्यांच्या प्रजाती या भागात आढळून येतात.निसर्गात वावरणारे पक्षी, प्राणी हे त्यांच्या निसर्ग रूपी कौशल्याने आपली भूक भागवत असतात. मनुष्य प्राणी जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात भटकंतीसाठी जातो तेव्हा आकर्षणापोटी निर्माण झालेल्या भूतदयेतून तो आपल्या जवळील खाद्यपदार्थ प्राणी, पक्ष्यांच्या पुढे करतो. मानवी खाद्यपदार्थ पक्ष्यांसाठी हानीकारक ठरु शकते. पोटाचे विकारिकंवा पिसांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. गंगापूर धरण परिसरात असलेली वृक्षसंपदा हे पक्ष्याचे रातथारा (रात्रीचे विश्रांतीस्थळ) आहे.- अनिल माळी, अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनपक्षीशास्र, जैवविविधता याबाबतीत सर्वसामान्यांमध्ये अज्ञान असते. कावळ्यांची संख्या एखाद्या नैसिर्गक अधिवासात जेव्हा वाढत जाते तेव्हा तेथील अन्य पक्षीजीवन धोक्यात सापडते. कावळा हा पक्षी अन्यप्रकारच्या गवताळ भागात आढळणार्या पक्ष्यांची अंडी खातो, त्यामुळे जैवसाखळी बिघडून असंतुलन वाढीस लागण्याचा धोका संभवतो. गंगापूर धरण परिसरात आयते मानवी खाद्यपदार्थ कावळ्याला टाकणे म्हणजेच हा धोका ओढवून निसर्गाची हानी करण्यासारखे आहे.- प्रतीक्षा कोठुळे, समन्वयक, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी आॅफ नाशिक

टॅग्स :gangapur-acगंगापूरDamधरण