लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:28 IST2021-09-02T04:28:49+5:302021-09-02T04:28:49+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून कोविड लसीचे विरगाव आरोग्य केंद्रात लसीकरण चालू होते. गावातील जनतेची गैरसोय होत असल्याने सरपंच कल्पना खैरनार ...

लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद
गेल्या अनेक दिवसांपासून कोविड लसीचे विरगाव आरोग्य केंद्रात लसीकरण चालू होते. गावातील जनतेची गैरसोय होत असल्याने सरपंच कल्पना खैरनार यांच्या पुढाकाराने मंगळवारी (दि.३१) वटार येथे ३५० लस उपलब्ध करून देण्यात आल्या. वटार व परिसरातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केल्याने आवारात नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टल्सचा पालन करताना नागरिक दिसत नव्हते.
सुरुवातीला या लसीकरणाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नव्हता, परंतु लसीकरण झालेल्या नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी लस घेण्यासाठी सकाळपासून आरोग्य केंद्रात गर्दी केली होती.
कोविड लस घेण्यासाठी तरुणांनी पाहिला डोस घेण्यासाठी मंगळवारी खूपच गर्दी केली होती. अठरा वयापासून पुढे लस असल्यामुळे मोठी गर्दी उसळली होती, लस कमी असल्याने अनेकांना लस न घेता परतावे लागले. दरम्यान, सध्या लस घेण्यासाठी होणारी गर्दी पाहून जास्तीत जास्त लस उपलब्ध व्हायला हव्यात, अशी मागणी उपसरपंच जितेंद्र शिंदे यांनी केली आहे.
यावेळी वैद्यकीय अधिकारी सविता बोरसे, गतपरिवर्तक स्मिता देवरे, आरोग्यसेविका मनीषा वाघ, आरोग्यसेवक राजेंद्र सोनवणे, पर्यवेक्षक पोपट अहिरे, विष्णू परदेशी, पुष्पा शिंदे आदी उपस्थित होते.
(३१ वटार) लसीकरणासाठी उपस्थिती मान्यवर.
310821\31nsk_24_31082021_13.jpg
लसीकरणासाठी उपस्थिती मान्यवर.