वडाळा चौफुलीजवळील गोठ्यात भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 01:07 AM2020-08-28T01:07:39+5:302020-08-28T01:08:05+5:30
वडाळा रोडवरील म्हशीच्या एका गोठ्यातील प्लॅस्टिकच्या भंगार मालाने पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने एकच धावपळ अन् गोंधळ उडाला. आकाशात धुराचे लोट दिसत असल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. तासाभरात अग्निशमन दलाच्या २ बंबाच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणण्यास जवनांना यश आले.
नाशिक : वडाळा रोडवरील म्हशीच्या एका गोठ्यातील प्लॅस्टिकच्या भंगार मालाने पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने एकच धावपळ अन् गोंधळ उडाला. आकाशात धुराचे लोट दिसत असल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. तासाभरात अग्निशमन दलाच्या २ बंबाच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणण्यास जवनांना यश आले.
हाजी सांडू भाई यांच्या मालकीच्या गोठ्यामध्ये गुरुवारी (दि.२७) सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानकपणे प्लॅस्टिकच्या भंगार मालाने पेट घेतला होता. सुदैवाने या घटनेत कुठल्याप्रकारची जीवितहानी झाली नाही. गोठ्यामधील म्हशी देखील सुरक्षित राहिल्या. घटनेची माहिती मिळताच सिडको येथील अग्निशमन केंद्राचे जवान बंबासहसह घटनास्थळी दाखल झाले तसेच अतिरिक्त मदत म्हणून शिंगाडा तलाव येथील मुख्यालयातूनसुद्धा एक बंबासह जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. फायरमन मोईन शेख, बाळासाहेब लहांगे, अविनाश सोनवणे, इस्माईल काजी आदींनी आगीवर नियंत्रण मिळविले.