कळवण शहरात खरेदीसाठी प्रचंड गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 00:46 IST2021-05-11T22:27:47+5:302021-05-12T00:46:08+5:30
कळवण : जिल्हा प्रशासनाने दहा दिवसाचा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी कळवण शहरात किराणा, भाजीपाला आदी खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.

कळवण शहरात खरेदीसाठी प्रचंड गर्दी
कळवण : जिल्हा प्रशासनाने दहा दिवसाचा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी कळवण शहरात किराणा, भाजीपाला आदी खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.
शिवाजीनगर परिसरातल्या जुना ओतूर रोड परिसर, मर्चंट बँक परिसरात सकाळी किराणा खरेदी आणि भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. यावेळी मेन रोडसह जुना ओतूर रोडवर वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती.
दहा दिवसाचा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कळवण येथे नदीपात्रात अथवा मंडईमध्ये भरणारा बाजार आता थेट रहदारी असणाऱ्या ओतूर रोडवर भरत असल्याने वाहनांची गर्दी एकीकडे तर नागरिकांची गर्दी दुसरीकडे असे चित्र गेल्या काही दिवसापासून दिसत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत भाजीपाला खरेदीसाठी मर्चंट बँक परिसरात मोठी गर्दी उसळली होती.