सायखेडा बाजार समितीत कांद्याची प्रचंड आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:17 PM2020-04-13T22:17:59+5:302020-04-13T23:07:15+5:30

अनेक दिवसांपासून बंद असलेल्या सायखेडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले आणि यंदाच्या हंगामातील विक्रमी आवक बाजार समितीत पाहायला मिळाली. आवारात ४४६ पिकअप व ११९ ट्रॅक्टर इतकी प्रचंड आवक झाल्याने बाजार समिती आवाराला जत्रेचे स्वरूप आले होते. शेतकऱ्यांच्या प्रचंड गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला.

Huge arrival of onion in the Sikheda Market Committee | सायखेडा बाजार समितीत कांद्याची प्रचंड आवक

सायखेडा बाजार आवारात सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा.

googlenewsNext
ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : विक्रीसाठी लगीनघाई

सायखेडा : अनेक दिवसांपासून बंद असलेल्या सायखेडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले आणि यंदाच्या हंगामातील विक्रमी आवक बाजार समितीत पाहायला मिळाली. आवारात ४४६ पिकअप व ११९ ट्रॅक्टर इतकी प्रचंड आवक झाल्याने बाजार समिती आवाराला जत्रेचे स्वरूप आले होते. शेतकऱ्यांच्या प्रचंड गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला.
कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, उन्हाळी कांद्याला सरासरी ९०० रुपये भाव मिळाला तर लाल कांद्याला सरासरी ६५० रुपये इतका भावे मिळाला. अनेक दिवसांपासून सायखेडा बाजार समितीतील कांदा लिलाव बंद होता. व्यापाऱ्यांनी स्वरक्षणासाठी कांदा लिलाव बंद ठेवला होता तर अनेक व्यापाºयांची इच्छा असूनही अनेक मजूर कामावर येत नसल्याने लिलाव बंद होते. परिसरातील सर्व कांदा शेतकºयांनी काढून तयार ठेवला होता. बाजार समितीच्या
वतीने कांदा लिलाव सुरू होत असल्याचे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले होते. त्यामुळे कांदा आवक प्रचंड प्रमाणात वाढली.
राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाउनमुळे कांदा लिलाव पुन्हा बंद होऊ शकतो या भीतीने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी वाहने आणली होती. त्यामुळे पहाटे ३ वाजेपासून बाजार समितीच्या आवारात ट्रॅक्टर, पिकअप यांची रिघ लागली होती. सायखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने वारंवार सूचना देऊन गर्दी पांगवण्यात येत होती तरीदेखील शेतकरी टोळ्याटोळ्यांनी उभे राहत होते. पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी अनेकदा काठीचा वापर करावा लागला. बाजार समितीच्या वतीने प्रत्येक चालकाच्या हाताला सॅनिटायझर लावूनच आत सोडण्यात येत होते तर बाजार समितीच्या आवारात ट्रॅक्टरने सोडियम क्लोराइडची फवारणीदेखील करण्यात आली. सायखेडा बाजार समितीत कांदा लिलाव सातत्याने व्यापारी बंद ठेवतात. त्यामुळे कांदा शेतात थोपवून राहातो. लिलाव एकदा सुरू झाली की प्रचंड आवक निर्माण होते. आवक कमी व्हावी यासाठी दररोज कांदा लिलाव सुरू ठेवावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Huge arrival of onion in the Sikheda Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.