जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:05+5:302021-07-07T04:17:05+5:30

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत असून, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सबसीडीमध्येही मोठी कपात ...

How to live Domestic gas cylinder goes up by Rs 25 | जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला

जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत असून, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सबसीडीमध्येही मोठी कपात करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरसाठी आता ८७५ रुपये मोजावे लागणार आहेत. गतवर्षी डिसेंबर महिन्यात गॅस ६५० रुपयांना मिळत होता. सात महिन्यांच्या कालावधीत त्यामध्ये तब्बल २२५ रुपयांची भाववाढ करण्यात आली असून, पूर्वीच कोरोनाने आर्थिक गणित बिघडविले असताना सिलिंडरच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट पुन्हा बिघडविले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी असतानासुद्धा पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ करण्यात येत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०२० मध्ये सिलिंडरचे दर ६५० रुपयांच्या जवळपास होते. मात्र,

त्यामध्ये सातत्याने वाढ करण्यात आली. आता या सिलिंडरचे दर ८७५ रुपये करण्यात आले. एकीकडे सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ होत असताना सबसिडीमध्ये कपात केली जात आहे. ग्राहकांना केवळ ३० ते ४० रुपये सबसिडी देण्यात येत आहे. मागील वर्षीपासून कोरोनामुळे लॉकडाऊन

असताना सर्वजण आर्थिक संकटात आहेत. त्यातच घरगुती गॅसच्या दरामध्ये वाढ करण्यात येत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

---

सात महिन्यांत २२५ रुपयांची वाढ

गॅस सिलिंडरचे दर डिसेंबर २०२० मध्ये ६५० रुपयांच्या जवळपास होते. मागील सात महिन्यांच्या कालावधीत

त्यामध्ये तब्बल २२५ रुपयांची भाववाढ करण्यात आली आहे. आता सिलिंडरचे दर ८७५ रुपयांच्या

जवळपास पोहोचले आहेत. सततच्या दरवाढीने गृहिणींच्या किचनचे बजेट कोलमडले आहे.

---

गावात पुन्हा पेटल्या चुली

-कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. काम मिळणे बंद झाले आहे, तर अनेकजण बेरोजगार

झाले आहेत. यातच घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत आहे.

त्यामुळे ग्रामीण भागातील महिला आता सर्रास चुलीकडे वळताना दिसून येत आहेत.

- गॅसवर मिळणाऱ्या सबसिडीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात येत आहे. त्यामुळे सिलिंडरसाठी रक्कम

आणायची कोठून, असा प्रश्न ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांना पडत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या सावटात अनेक महिला जंगलामध्ये सरपण गोळा करायला जात आहेत.

- धूरमुक्त गाव करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागातील

लाभार्थ्यांसाठी उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली होती. या लाभार्थ्यांना पूर्वी बऱ्यापैकी सबसिडी देण्यात येत होती. मात्र, आता त्यामध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चूल पेटत

असल्याचे दिसून येत आहे.

----

घर खर्च भागवायचा कसा

कोरोनामुळे आर्थिक अडचण आहे. कामसुद्धा बंद आहे. त्यामुळे दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. त्यातच शासनाकडून सिलिंडरच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंब कसे

चालवायचे, असा प्रश्न आहे.

- रोशनी पवार, गृहिणी

खाद्यतेल, डाळ आदी जीवनावश्यक वास्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. आता गॅस सिलिंडरच्या

किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे किचनचे बजेट बसवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

प्रतीक्षा कदम, गृहिणी

जुलैमध्ये उच्चांकी

ऑगस्ट ते डिसेंबर २०२० मध्ये झालेली दरवाढ

महिना - घरगुती - व्यासायिक गॅस

ऑगस्ट - ५९८ - -११४५

सप्टेंबर - ५९८ - -११४६

ऑक्टोबर - ५९८ - -११७०

नोव्हेंबर - ५९८ - - १२४९

डिसेंबर - ६९८ - -१३४५

------

जानेवारी ते जुलै २०२१ दरम्यान झालेली दरवाढ

महिना - घरगुती - व्यासायिक गॅस

जानेवारी - ६९८ - १३४५

फेब्रुवारी - ७७३ - १५५७

मार्च - ८२३ - १६४२

एप्रिल - ८१३ - १६७०

मे - ८१३ - १६७०

जून - ८१३ - १६७०

जुलै - ८३८ - १५८२

----

डिसेंबर २०२० मध्ये उच्चांकी वाढ

गतवर्षी ३० नोव्हेंबरला घरगुती सिलिंडरची किंमत ५९८ रुपये होती, तर १ डिसेंबर यात तब्बल शंभर रुपयांनी उच्चांकी वाढ होऊन सिलिंडरची किंमत ६९८ रुपयांपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना महागाईचा सर्वांत मोठा धक्का बसला.

Web Title: How to live Domestic gas cylinder goes up by Rs 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.