कशा कशाची चौकशी करणार?

By Admin | Updated: January 23, 2016 23:57 IST2016-01-23T23:57:03+5:302016-01-23T23:57:27+5:30

जयंत जाधव यांचा राम शिंदे यांना सवाल

How to inquire about something? | कशा कशाची चौकशी करणार?

कशा कशाची चौकशी करणार?

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी धार्मिक पर्यटन व नाशिकच्या विकासासाठी अनेक प्रकल्प नाशिकमध्ये साकारले असून, पर्यटन राज्यमंत्री प्रा. राम शिंदे हे कशा कशाची चौकशी करणार, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वी बोट क्लबचे उद्घाटन झालेले असताना बोट क्लब का सुरू होऊ शकला नाही याचा खुलासाही शिंदे यांनी करावा, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या शिंदे यांनी गंगापूर धरणातील बोट क्लबच्या बोटींच्या खरेदीची चौकशी करण्याचे सुतोवाच केले होते त्यावर आमदार जाधव यांनी प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी विमानतळ, कलाग्राम व पर्यटन वृद्धीसाठी शेकडो प्रकल्प साकारले आहेत या प्रकल्पांची चौकशी अद्याप बाकी असून, त्यांचीही चौकशी करणार का? असा सवाल करून शिंदे यांनी अगोदर बोटक्लब पाहावा व मगच चौकशींची घोषणा करावी, असे आव्हानही जाधव यांनी दिले. भुजबळ यांनी केलेली विकासकामे सरकारच्या डोळ्यात खूपत असून, त्यांनी साकारलेल्या प्रकल्पांच्या चौकशा केल्या तर सरकारची अख्खी कारकीर्द चौकशांमध्ये संपून जाईल, असा दावाही जाधव यांनी केला आहे.

Web Title: How to inquire about something?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.