शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

...असे कसे अच्छे दिन? संतप्त नागरिकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:18 IST

एकीकडे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर वाढत असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचीही दरवाढ सातत्याने केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा ‘चटका’ बसत आहे. सत्तेत येण्याअगोदर भाजपा सरकारने दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न भंगले असून, रविवारी (दि.९) पेट्रोल प्रति लिटर ८८.३६ पैसे इतके झाले. दरवाढीचा हा अद्यापपर्यंतचा उच्चांक नोंदविला गेला. त्यामुळे भाजपाचे असे कसे अच्छे दिन? असा संतप्त सवाल नाशिकरांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देपेट्रोल-डिझेलचा भडका सरकारने दर नियंत्रणात आणावे

नाशिक : एकीकडे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर वाढत असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचीही दरवाढ सातत्याने केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा ‘चटका’ बसत आहे. सत्तेत येण्याअगोदर भाजपा सरकारने दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न भंगले असून, रविवारी (दि.९) पेट्रोल प्रति लिटर ८८.३६ पैसे इतके झाले. दरवाढीचा हा अद्यापपर्यंतचा उच्चांक नोंदविला गेला. त्यामुळे भाजपाचे असे कसे अच्छे दिन? असा संतप्त सवाल नाशिकरांनी उपस्थित केला आहे.देशभरात इंधनदरवाढीने नागरिक त्रस्त झाले असून, सर्वच विरोधी पक्ष इंधनदरवाढीविरोधात एकवटले आहे. विरोधी पक्षांनी सोमवारी (दि.१०) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या हाकेला सर्वपक्षीय धार मिळाली असून, प्रवासी वाहतूकदारसंघटनाही या बंदमध्ये सहभागी होण्याची चिन्हे आहेत. इंधनदरवाढीमुळे सर्वच क्षेत्रात महागाई चक्रकार पद्धतीने झिरपत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपा सरकारविरुद्ध रोष तीव्र होऊ लागला आहे. सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाली असून, सरकारने देशभरात इंधनाच्या दरावर त्वरित नियंत्रण मिळविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकूणच नागरिकांच्या वाढत्या रोषाबरोबरच या सरकारला विरोधी पक्षांच्या विरोधालाही सामोरे जावे लागत आहे.रविवारी सकाळपासून शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या अत्यंत कमी प्रमाणात दिसून आली. सुटीचा आनंद घेण्यसाठी नाशिककर घराबाहेर अपवादानेच पडले. पेट्रोल दरवाढीने रविवारी उच्चांक गाठला होता.८८.३६ रुपये दराने शहरातील पेट्रोल पंपावरून पेट्रोलविक्री होत होती. तसेच पॉवर पेट्रोलचे दर ९१.१८ रुपयांवर पोहचले होते, तर डिझेलचे दर ७६.३५ रुपयांवर पोहचले होते. डिझेल दरवाढीचाही हा उच्चांक ठरला. आतापर्यंत डिझेलचे दर चालू आठवड्यात ७४ रुपये प्रतिलिटरच्या जवळपास स्थिरावत होते; मात्र रविवारी थेट ७६ रुपयांच्या पुढे दर गेल्याने मालवाहू वाहनांसह काही कौटुबिंक मोटारचालकांनीही नाराजी व्यक्त केली. परिणामी नागरिकांनी गरजेपुरतेच घराबाहेर पडणे रविवारी पसंत केले.कोट..पेट्रोलदरवाढ सरकारने तातडीने नियंत्रणात आणण्याची गरज आहे. सर्वसामान्य जनता या महागाईमध्ये होरपळून निघत आहे, सरकारने याचा विचार करावा. सरकारला पेट्रोल दरवाढ रोखणे शक्य आहे, मात्र राज्यकर्त्यांकडून इच्छाशक्ती दाखविली जात नाही, हे या देशाचे दुर्दैव.-अविनाश किंबहुने, नागरिक (फोटो - ०९पीएचएसपी७२)—-आजपर्यंत पेट्रोल, गॅस, डिझेलचे दर एवढे आकाशाला कधीही भिडले नव्हते. न भुतो न भविष्य मोदी सरकारने असे अच्छे दिन दाखविले की ते कधीही विसरता येणार नाही. त्यांनी ‘अच्छे’ शब्दाची व्याख्याच बदलून टाकली. जनतेला पर्याय नसल्यामुळे इंधन महाग झाले तरी ते खरेदी करावेच लागणार आहे; मात्र सरकारने सहनशीलतेचा अंत पाहू नये.-यशवंत अहिरे, रहिवासी ( ०९पीएचएसपी७५)—-माझा रिक्षा व्यवसाय असून, दररोज पेट्रोल भरावेच लागते. पेट्रोलचे दर दररोज वाढत आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. शासनाने दरवाढीवर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे. पेट्रोलचे दर जरी वाढले तरी प्रवासी जादा दर देणे पसंत करीत नाही, त्यामुळे नाईलाज होतो.- अशोक विठ्ठलकर, रिक्षाचालक (०९पीएचएसपी६८)

टॅग्स :Petrolपेट्रोलInflationमहागाई