आताच फिट येऊन कसं चालेल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:56 AM2019-10-13T00:56:30+5:302019-10-13T00:57:41+5:30

प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार करण्यात दंग झाले आहेत. काही उमेदवार सकाळी लवकर उठून प्रचार करण्यावर भर देतात, तर काही जणांकडून रात्री उशिरापर्यंत प्रचारासह दुसऱ्या दिवसाच्या नियोजनाला प्राधान्य दिले जाते.

How does it fit now? | आताच फिट येऊन कसं चालेल ?

आताच फिट येऊन कसं चालेल ?

Next
ठळक मुद्देभटक्या

प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार करण्यात दंग झाले आहेत. काही उमेदवार सकाळी लवकर उठून प्रचार करण्यावर भर देतात, तर काही जणांकडून रात्री उशिरापर्यंत प्रचारासह दुसऱ्या दिवसाच्या नियोजनाला प्राधान्य दिले जाते. नाशिकमधील एका उमेदवाराची सामान्य मतदारांप्रमाणेच आपल्या नातेसंबंधांवर अधिक भिस्त आहे. ही आपली हक्काची मते असून, ती आपल्यालाच मिळणार असल्याने त्यांना रात्री उशिरापर्यंत कधीही भेटता येर्ईल, अशा विचाराने तो गाठीभेटी रात्री घेत आहेत. मात्र, प्रचाराला केवळ आठवडाच उरल्याने सकाळच्या लवकरच्या वेळेचाही अधिकाधिक उपयोग करून घेण्यासाठी हा उमेदवार सकाळी सहापासूनच विविध जॉगिंग ट्रॅकवर भेट देऊ लागला. प्रारंभीचे चार जॉगिंग ट्रॅक त्या उमेदवाराने बºयाच उत्साहाने पूर्ण केले. तिथे त्यावेळी असणाºया प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांनाही उमेदवार ‘काका लक्ष राहू द्या’ असे म्हणत विनंती करीत पुढच्या जॉगिंग ट्रॅककडे रवाना होत होते. पाचव्या ट्रॅकवर पोहोचेपर्यंत सकाळचे ९ वाजून गेले होते. तेवढ्यात एका ज्येष्ठ नागरिकांच्या घोळक्याला बघून हा उमेदवार पुन्हा काका लक्ष राहू द्या, आपली निशाणी लक्षात ठेवा, असे म्हणत विनंती करीत होता. तेवढ्यात एका आजोबांनी उमेदवाराच्या घामाघूम चेहºयाकडे बघून तुम्ही तर फिट दिसतात, असे म्हणत त्या उमेदवाराला प्रतिसाद दिला. मात्र, सकाळपासून भटकून काहीशा दमलेल्या उमेदवाराने ‘काका फिट कसला ? फिट यायची वेळ आली’ असे म्हणताच हंशा पिकला. त्यावर काका म्हणाले ‘भाऊ, फिट आताच येऊन कशी चालेल’? असे म्हणताच मैदानावर अजूनच मोठा हास्यस्फोट झाला. भटक्या
आताच फिट येऊन कसं चालेल ?
प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार करण्यात दंग झाले आहेत. काही उमेदवार सकाळी लवकर उठून प्रचार करण्यावर भर देतात, तर काही जणांकडून रात्री उशिरापर्यंत प्रचारासह दुसºया दिवसाच्या नियोजनाला प्राधान्य दिले जाते. नाशिकमधील एका उमेदवाराची सामान्य मतदारांप्रमाणेच आपल्या नातेसंबंधांवर अधिक भिस्त आहे. ही आपली हक्काची मते असून, ती आपल्यालाच मिळणार असल्याने त्यांना रात्री उशिरापर्यंत कधीही भेटता येर्ईल, अशा विचाराने तो गाठीभेटी रात्री घेत आहेत. मात्र, प्रचाराला केवळ आठवडाच उरल्याने सकाळच्या लवकरच्या वेळेचाही अधिकाधिक उपयोग करून घेण्यासाठी हा उमेदवार सकाळी सहापासूनच विविध जॉगिंग ट्रॅकवर भेट देऊ लागला. प्रारंभीचे चार जॉगिंग ट्रॅक त्या उमेदवाराने बºयाच उत्साहाने पूर्ण केले. तिथे त्यावेळी असणाºया प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांनाही उमेदवार ‘काका लक्ष राहू द्या’ असे म्हणत विनंती करीत पुढच्या जॉगिंग ट्रॅककडे रवाना होत होते. पाचव्या ट्रॅकवर पोहोचेपर्यंत सकाळचे ९ वाजून गेले होते. तेवढ्यात एका ज्येष्ठ नागरिकांच्या घोळक्याला बघून हा उमेदवार पुन्हा काका लक्ष राहू द्या, आपली निशाणी लक्षात ठेवा, असे म्हणत विनंती करीत होता. तेवढ्यात एका आजोबांनी उमेदवाराच्या घामाघूम चेहºयाकडे बघून तुम्ही तर फिट दिसतात, असे म्हणत त्या उमेदवाराला प्रतिसाद दिला. मात्र, सकाळपासून भटकून काहीशा दमलेल्या उमेदवाराने ‘काका फिट कसला ? फिट यायची वेळ आली’ असे म्हणताच हंशा पिकला. त्यावर काका म्हणाले ‘भाऊ, फिट आताच येऊन कशी चालेल’? असे म्हणताच मैदानावर अजूनच मोठा हास्यस्फोट झाला.

Web Title: How does it fit now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.