घरकुल योजनेतील घरे वंचितांना द्यावीत

By Admin | Updated: September 5, 2015 22:23 IST2015-09-05T22:22:25+5:302015-09-05T22:23:03+5:30

निवेदन : सेनेचा आंदोलनाचा इशारा

Housing schemes should be provided to the workers | घरकुल योजनेतील घरे वंचितांना द्यावीत

घरकुल योजनेतील घरे वंचितांना द्यावीत

नाशिक : शहर झोपडपट्टी मुक्त व्हावे याकरिता नेहरू अभियानाच्या माध्यमातून शहरात घरकुल योजना राबविण्यात आली; मात्र अद्यापपर्यंत या योजनेतील लाभार्थींना घरे दिली गेली नसल्याने, त्यांना एक महिन्याच्या आत घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
निलगिरी बाग, वडाळागाव, संजयनगर, फुलेनगर, सामनगाव, चुंचाळे, शिवाजीवाडी या भागांमध्ये २००७ साली १६ हजार घरांची घरकुल योजना राबविण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात ७ ते ८ हजार घरांचे वाटप केले असल्याने बरीच घरे पडून आहेत. यातील केवळ २८४ घरांचीच सोडत झाल्याने अजून कित्येक लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. त्यांना एक महिन्याच्या आत घरे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.

Web Title: Housing schemes should be provided to the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.